वेंगुर्ले येथे आयोजित जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

वेंगुर्ले येथे आयोजित जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

*कोंकण एक्सप्रेस*

*वेंगुर्ले येथे आयोजित जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद*

*वेंगुर्ला : प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग जिल्हा शूटिंग असोसिएशन आणि उपरकर शूटिंग अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ले येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या स्पर्धेचे उद्घाटन वेंगुर्ला नगरपालिकेचे मुख्याधिकारी पारितोषिक कंकाळ यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी वेंगुर्ला नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष राजन गिरप, मुंबई उच्च न्यायालयाचे वकील महेश राऊळ, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक विक्रम भांगले, सिंधुदुर्ग जिल्हा शूटिंग असोसिएशनचे सचिव तसेच उपरकर शूटिंग अकॅडमीचे प्रशिक्षक कांचन उपरकर, दीपक सावंत, सौ. प्रज्ञा उपरकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचलन सातार्डा हायस्कूलचे मुख्याध्यापक तसेच नेमबाज प्रशांत सावंत यांनी केले. या स्पर्धेस अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट ओरोस चे चिराग बांदेकर तसेच लोकमान्य मल्टीपर्पज को- ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, वेंगुर्ला पुरस्कर्ते म्हणून लाभले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!