*कोकण Express*
*खारेपाटणमध्ये विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई*
*खारेपाटण ः प्रतिनिधी*
सध्या संपूर्ण राज्यात व देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कणकवली तालुक्यातील खारेपाटण ग्रामपंचयतीच्या वतीने आज सोमवारी खारेपाटण शहरात विनामस्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाही करुन त्यांच्याकडून प्रति २००/- रुपये रकमेची पावती आकारून सुमारे ३०००/- रुपये इतक्या रकमेचा दंड वसुल करण्यात आला.
यावेळी विनामास्क फिरणाऱ्या एकूण १५ नागरीकावर कारवाही करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला. खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत,ग्रामविकास अधिकारी जि एस वेंगुर्लेकर,आरोग्यसेविक लक्ष्मी करोड,खारेपाटण पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस हवालदार उद्धव साबळे, व ग्रामपंचयत कर्मचारी राजेश जाधव,विश्वनाथ गुरव आदी पदाधिकरी या कारवाही दरम्यान उपस्थित होते. कारवाही करण्यात आलेल्या नागरिकांना खारेपाटण ग्रामपंचयतीच्या वतीने मास्क वाटप देखील करण्यात आले.