*कोंकण एक्सप्रेस*
*कलमठ सरपंच संदिप मेस्त्री यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरात ७५ रक्तदात्यानी केले रक्तदान*
*कणकवली : प्रतिनिधी*
भाजपा सरचिटणीस संदिप साटम यांच्या प्रमुख उपस्थितीत
ग्रामपंचायत कलमठ श्री देव काशी कलेश्वर सभागृहात कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबीराचे महेश लाड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.या शिबिरात भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री,संतोष पुजारे, सागर राणे, नितीन पवार,पप्पू यादव, सुप्रिया मेस्त्री, तेजस लोकरे, स्वाती नारकर, दिनेश गोठणकर, श्रेयस चिंदरकर,पत्रकार राजन चव्हाण, गुरू वर्देकर मिलिंद गुरव, आबा कोरगावकर, मिलिंद चिंदरकर उपस्थित होते.
दरवर्षी प्रमाणे आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.सुमारे ७५ रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले.शिबिर यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष तेजस लोकरे, नितीन पवार, समीर कवठणकर,श्रेयस चिंदरकर,परेश कांबळी, समीर ठाकूर ,स्वरूप कोरगावकर, समर्थ कोरगावकर, विराज मेस्त्री, सचिन वाघेश्री,अभी साटविलकर, विठ्ठल चव्हाण यांनी मेहनत घेतली. यावेळी मंडळाच्या वतीने संदिप मेस्त्री यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

