*कोंकण एक्सप्रेस*
*वेंगुर्ले रवळनाथाचा उद्या जत्रोत्सव*
*वेंगुर्ले :प्रतिनिधी*
वेंगुर्ले शहरातील श्री देव रवळनाथाचा वार्षिक जत्रोत्सव २५ डिसेंबर रोजी होणार आहे.यानिमित्त सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांसह केळी, नारळ ठेवणे व रात्री पार्सेकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे.यावेळी भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन देवस्थानतर्फे केले आहे.

