*कोंकण एक्सप्रेस*
*खानोली गवळदेव मंदिराचा २४ व २५ रोजी जीर्णोद्धार*
*वेंगुर्ले : प्रतिनिधी*
खानोली येथील श्री देव गवळदेव मंदिराचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम २४ व २५ डिसेंबर रोजी विविध धार्मिक,अध्यात्मिक व सांकृतिक कार्यक्रमांनी संपन्न होत आहे.
त्यानिमित्त मंगळवार, २४ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते दुपारी १ पर्यंत मंगलाचरण, देहशुध्दी, प्रायश्चित, देवतांना आमंत्रण, गणपती पूजन, देवता स्थापन पूजन, ग्रहमंडल देवता हवन आदी धार्मिक विधी, सायंकाळी ४ वाजता ग्रामस्थांची भजने,सायंकाळी ५.३० वाजता ह.भ.प. सदाशिव पाटील बुवा, आंदुर्ले यांचे कीर्तन,रात्री ७.३० वाजता खानोलकर पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ, खानोली यांचा नाट्यप्रयोग आयोजित करण्यात आला आहे.
बुधवार २५ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते दुपारी १२.३० पर्यंत प्रासाद शुद्धी, भक्तगणांना आशीर्वाद, प्रार्थना, महानैवेद्य, महाप्रसाद, सायंकाळी ४ ते ५.३० वाजता ग्रामस्थांची भजने, ५.३० वाजता ह.भ.प. भाऊ नाईक, वेतोरे यांचे कीर्तन,रात्री ७.३० वाजता विजय नारायण परब पुरस्कृत श्री सावरेश्वर दशावतार नाट्यमंडळ, आवेरे यांचा नाट्यप्रयोग होणार आहेत.या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव गवळदेव जीर्णोद्धार समितीने केले आहे.

