*कोंकण एक्सप्रेस*
*राजू मसुरकर यांच्याकडून सावंतवाडी शहरात लोखंडी बांबू सारखी शिडी तिरडीची सुविधा उपलब्ध*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
कुठलाही व्यक्ती मृत्युमुखी पडल्यास सावंतवाडी शहरामध्ये निधन झाल्यानंतर स्मशानभूमी मध्ये नेताना बांबूची आवश्यकता असते. परंतु बऱ्याच ठिकाणी बांबू उपलब्ध न झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आणि ते बांबू आणण्यासाठी कोलगाव येथून ते बांबू आणावे लागतात.यासाठी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान अध्यक्ष राजू मसुरकर यांनी नागरिकांना लोखंडी पोकळ बांबू सारखी पेंट करून तिरडी उपलब्ध करून सावंतवाडी नागरिकांना दिली आहे.
ही शिडी सावंतवाडी स्मशानभूमी मधून मारुती निरोडेकर यांच्याकडून घेऊन जाण्यात यावी.त्यांचा फोन नंबर. *9405496502*. अनेक व्यक्तींच्या कुटुंबामध्ये मित्र मंडळ मध्ये बांबू आणण्यासाठी माणसं सुद्धा उपलब्ध नसतात याची दखल जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी घेतली आहे.ही नागरिकांच्या सावंतवाडी शहरातील सोय उपलब्ध व्हावी यासाठी लोखंडी बांबू सारखी शिडी तिरडीचे 2 नग उपलब्ध झाले आहेत.

