*कोंकण एक्सप्रेस*
*सावंतवाडीच्या राजघराण्यातील लखमराजे भोसले दाम्पत्याला देशस्तरावरील “सर्वोत्कृष्ट पुरस्कार”*
*दिल्लीत मान्यवरांच्या हस्ते वितरण ; टॅव्हल्स प्लस लिझर संस्थेने घेतली पाककलेची दखल*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
येथील संस्थानचे युवराज लखमराजे भोसले आणि युवराज्ञी श्रध्दाराणी भोसले या दाम्पत्याला भारतातील सर्वोत्कृष्ट “हेरिटेज पाककृती अवार्ड” प्राप्त झाला असून दिल्ली येथे या पुरस्काराचे मान्यवरांच्या हस्ते उभयतांना या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.हा पुरस्कार टॅव्हल्स प्लस लिझर या संस्थेकडुन देण्यात आला.
भोसले दाम्पत्याने सावंतवाडीच्या राजवाड्यात पंचतारांकित हॉटेल सुरु केले आहे.या माध्यमातून देशविदेशातील पर्यटकांना त्यांनी सावंतवाडीसह कोकणच्या संस्कृतीची आणि खाद्यपदार्थाची ओढ लावली आहे.याची दखल घेत त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.