*कोंकण Express*
*विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला तालुकास्तरिय विज्ञान प्रदर्शनात अव्वलस्थानी*
*कणकवली : प्रतिनिधी*
विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेतील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरिय विज्ञान प्रदर्शनात अव्वलस्थान प्राप्त करून प्रशालेच्या शिरपेचात मानाचे स्थान प्राप्त केले आहे.कणकवली तालुक्याचे विज्ञान प्रदर्शन न्यू इंग्लिश स्कूल फोंडायेथे आयोजित केले होते.तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळा व प्राथमिक शाळांनी या प्रदर्शनात सहभाग घेतला होता माध्यमिक गट प्रतिकृतीमध्ये प्रथम क्रमांक कुमारी दिव्या हुमरसकर हिला प्राप्त झाला.प्राथमिक गट कुमार गौरेश काडगे यांने तृतीय क्रमांक प्राप्त केला.यांची जिल्हास्तरावर निवड करण्यात आली.
प्रश्नमंजूषा माध्यमिक गटात कुमार ध्रुव तेंडूलकर कुमारी सानवी कारेकर यांनी तृतीय क्रमांक मिळविला.वक्तृत्व स्पर्धेत प्राथमिक गटात कुमारी कर्तुत्वा हरकुळकर हिने तृतीय क्रमांक प्राप्त करून जिल्हास्तरावर निवड झाली .
या सर्व विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षक श्री पृथ्वीराज बर्डे सर,सौ शर्मिला केळुसकर मॅडम यांनी मार्गदर्शन केले.या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री तवटे साहेब चेअरमन डॉ साळुंखे मॅडम,सचिव श्री वळजूं साहेब,प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पी.जे कांबळे सर,पर्यवेक्षक सौ वृषाली जाधव मॅडम सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले.