विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत जागतिक स्वच्छता दिन साजरा

विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत जागतिक स्वच्छता दिन साजरा

*कोंकण Express*

*विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत जागतिक स्वच्छता दिन साजरा*

*कणकवली ः प्रतिनिधी*

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता दिन प्रशालेत साजरा करण्यात आला यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक पिराजी कांबळे सर यांनी महात्मा गांधीजीनी भारताला स्वच्छतेचा मंत्र देऊन निरोगी आयुष्य जगण्याची प्रेरणा कशी दिली या विषयी मार्गदर्शन केले तसेच भारतरत्न माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या विचारांनी भारताची प्रगती कशी झाली या विषयी मार्गदर्शन केले कुमारी हरकुळकर या विद्यार्थीनीने गांधीजीच्या जीवन चरित्राची माहिती कथन केली कुमार लिनेश कदम यांने गांधीजीच्या सत्याग्रहा विषयी माहिती सांगितली या कार्यक्रमाचे निवेदन कुमारी मृणाल पाटील हिने सुंदर रितीने करून कार्यक्रम उठावदार केला . यानंतर प्रशालेच्या परिसराची स्वच्छता इयता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थीनी नेटक्या नियोजनाने करून शाळेचा परिसर स्वच्छ करून गांधीजीच्या विचारांचे आचरण कृतीत आणले यावेळी पर्यवेक्षिका वृषाली जाधव व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!