*कोकण Express*
*मळगांव ग्रामपंचायतवर भाजपचाच झेंडा*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
मळगाव ग्रामपंचायत सरपंच पदी भाजपच्या स्नेहल जामदार यांची निवड झाली असून, उपसरपंच पदी हनुमंत पेडणेकर यांची निवड झाली आहे. यावेळी भाजप विरूद्ध शिवसेना अशी ही निवडणूक झाली होती. या ग्रामपंचायत मध्ये भाजपचे ७ तर शिवसेनेचे ६ उमदेवार निवडून आले होते. या विजयानंतर भाजपा पदाधिकार्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी माजी सभापती राजू परब, निरीक्षक तथा निरवडे सरपंच प्रमोद गावडे, भाजपा महिला तालुकाध्यक्षा गीता परब, नेमळे सरपंच विनोद राऊळ, माजी सरपंच तेजपाल सावळ, गणेश पेडणेकर, विजयानंद नाईक आदींसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

