सावंतवाडी भाजपच्या शहर अध्यक्षपदी अजय गोंदावले यांची फेरनिवड

सावंतवाडी भाजपच्या शहर अध्यक्षपदी अजय गोंदावले यांची फेरनिवड

*कोंकण Express*

*सावंतवाडी भाजपच्या शहर अध्यक्षपदी अजय गोंदावले यांची फेरनिवड…*

*उत्कर्षा सासोलकर प्रभारी शहराध्यक्ष; आगामी विधानसभेच्या तोंडावर खांदेपालट…*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

येथील भाजपच्या शहराध्यक्षपदी अजय गोंदावले यांची फेर निवड करण्यात आली आहे. तर मोहिनी मडगावकर असलेल्या शहराध्यक्षपदी प्रभारी म्हणून माजी नगरसेविका उत्कर्षा सासोलकर यांना संधी देण्यात आली आहे. आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजू परब यांनी या निवडी जाहीर केले. दरम्यान भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व सरचिटणीस महेश सारंग यांच्या शिफारशीनुसार आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवड करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी जाहीर करण्यात आलेली अन्य कार्यकारणी पुढील प्रमाणेः उपाध्यक्ष सत्यवान बांदेकर, गुरूदास मठकर, अनिल सावंत, मयुर लाखे,

संदेश टेमकर तर सरचिटणीस विनोद सावंत, परिक्षित मांजरेकर यांची निवड करण्यात आली. संजय वरेरकर, कृष्णा लाखे चिटणीस व

सोशल मीडिया प्रमुखपदी किशोर चिटणीस, प्रवक्तेपदी अँड. संजू शिरोडकर यांची नियुक्ती करण्यात आली. महिला मोर्चा अध्यक्षपदी मोहीनी मडगावकर तर प्रभारीपदी उत्कर्षा सासोलकर यांची निवड करण्यात आली. तसेच निमंत्रित सदस्य पदी कुणार शृंगारे, निशिकांत तोरसकर, आनंद नेवगी, राजू बेग, यशवंत कोरगावकर, उदय नाईक, अॅड. परिमल नाईक, सुधीर आडिवरेकर, नासीर शेख, समृद्धी विर्नाडकर, दिपाली भालेकर यांची निवड जाहीर करण्यात आल्याचे भाजप जिल्हा उपाध्यक्ष संजू परब यांनी सांगितले. तसेच केतन आजगावकर यांच्या ऐवजी प्रवक्ते म्हणून अॅड. संजू शिरोडकर तर प्रभारी महिला अध्यक्षा म्हणून अनुभवी माजी नगरसेविका उत्कर्षा सासोलकर यांना संधी देण्यात आल्याची माहिती संजू परब यांनी दिली. यावेळी शहराध्यक्ष अजय गोंदावळे, परिक्षित मांजरेकर, मोहीनी मडगावकर, संजय वरेरकर, विनोद सावंत, क्लेटस फर्नाडिस आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!