लोरे नं.1 येथील ग्रामस्थांनी सुरू केलेले उपोषण तात्पुरत्या स्वरूपात मागे

लोरे नं.1 येथील ग्रामस्थांनी सुरू केलेले उपोषण तात्पुरत्या स्वरूपात मागे

*कोंकण Express*

*लोरे नं.1 येथील ग्रामस्थांनी सुरू केलेले उपोषण तात्पुरत्या स्वरूपात मागे*

*कणकवली ः प्रतिनिधी*

दिनांक 15 ऑगस्ट 2018 रोजी, लोरे नं.1 येथील ग्रामस्थांनी सुरू केलेले उपोषण, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. संदेश जी पारकर यांच्या विनंतीस मान देऊन, 20 ऑगस्ट रोजी तात्पुरत्या स्वरूपात मागे घेण्यात आले आहे. * हे उपोषण सहा दिवसांपासून सुरू होते, परंतु अद्याप त्यांना न्याय मिळालेला नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या संदर्भात योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. संदेश जी पारकर यांनी ही माहिती देताना सांगितले की, 19/20 मध्ये रस्त्याचे काम पूर्ण झाले होते. या कामाची सखोल चौकशी करून अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, ही लोरे नं 1 येथील ग्रामस्थांची प्रमुख मागणी आहे. याशिवाय, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत झालेल्या रस्त्यावर अतिक्रमण झाल्याची तक्रारही ग्रामस्थांनी केली आहे. या अतिक्रमणात छप्पर व बांध घालून रस्ता अडवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात योग्य ती चौकशी करून दोर्षीवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

त्यावेळी उपोषणकर्त्यांनी श्री. संदेश जी पारकर यांचे आभार मानले व आमच्या पाठीमागे असेच उभे राहण्याचे विनंती केली.शेवटी, उपोषण तात्पुरते स्थगित करण्याचे आवाहन श्री. संदेश जी पारकर यांनी केले आणि प्रशासन व सरकारशी लढाई कायम राहील,असे सांगितले,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!