*कोंकण Express*
*सुनील तळेकर वाचनालयाच्या अध्यक्षपदी नारायण वळंजू यांची निवड*
*उपाध्यक्षपदी शशांक तळेकर तर सचिव पदी मिनेश तळेकर*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
तळेरे येथील स्व. सुनील तळेकर सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षपदी नारायण (राजू) वळंजू यांची अध्यक्षपदी, उपाध्यक्ष पदी शशांक तळेकर तर सचिव पदी मिनेश तळेकर यांची निवड करण्यात आली. ही कार्यकारिणी पुढील 3 वर्षांसाठी निवडण्यात आलेली आहे.
या वाचनालयाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. यावेळी पुढील 3 वर्षांसाठी ही कार्यकारिणी निवडण्यात आली. नवीन निवडलेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : नारायण (राजू) वळंजू (अध्यक्ष), शशांक तळेकर (उपाध्यक्ष), मिनेश तळेकर (सचिव) तर सदस्य पदी डॉ. अभिजित कणसे, हेमंत महाडिक, ध्रुव बांदिवडेकर, सौ. रेश्मा तळेकर, उदय दुदवडकर, निलेश सोरप यांची निवड करण्यात आली.
ही नवीन कार्यकारिणी प्रत्यक्षात 26 नोव्हेंबर पासून आपले कामकाज पाहिल. या नवीन कार्यकारिणीचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या. वाचनालयाची स्वत: ची इमारत पूर्णत्वास नेण्याचे दिवंगत अध्यक्ष विनय पावसकर यांचे अपूर्ण स्वप्न आपण पूर्ण करण्याचा आणि विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी नारायण वळंजू यांनी केले.

