*कोंकण Express*
*अन्यथा गोडावून फोडून धान्य वाटणार*
*ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबूराव धुरी यांचा इशारा..*
* दोडामार्ग ः प्रतिनिधी*
रेशनकार्ड धारकांना सोमवार (ता. २९) पर्यंत धान्य वितरण झाले नाही तर शिवसेनेच्या वतीने गोडावून फोडून रेशनकार्ड धारकांना धान्य वितरण केले जाईल असा इशारा शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख बाबूराव धुरी यांनी दिला आहे.
शासनाने रेशनकार्ड धारकांना धान्य वितरण करण्यासाठी धान्य दुकानदारांकडे दिलेल्या ई पॉस मशीनला सर्व्हर डाउन असल्याने एरर येत आहे. त्यामुळे दोडामार्ग तालुक्यातील धान्य वितरण प्रणाली ठप्प झाली आहे. यामुळे रेशनकार्ड धारक तसेच दुकान धारक दरम्यान वाद होत आहेत. लोकांची मोठी गैरसोय झाली आहे. असे असताना शासन स्तरावरून ऑफलाईन पध्दतीने धान्य वितरण देखील केले जात नाही. सर्वासामान्य लोकांचे हाल होत असल्याने शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख बाबूराव धुरी यांनी सर्व्हर चालत नाही तर गोडावूनमध्ये धान्य वितरण का केले. असा सवाल करुन सोमवार (ता. २९) पर्यंत धान्य वितरण झाले नाही तर शिवसेनेच्या वतीने गोडावून फोडून रेशनकार्ड धारकांना धान्य वितरण केले जाईल असा इशारा दिला. तसेच होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील असेही म्हटले आहे.