*कोंकण Express*
*विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत शासकीय शिष्यवृती योजनांचा महाजागर*
*कणकवली ः प्रतिनिधी*
विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत शिक्षण विभाग योजना कार्यालयामार्फत विविध योजना विद्यार्थ्याच्या शैक्षणिक उन्नतीसाठी राबविल्या जातात या योजना विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत थेट पोहचल्या तरच विद्यार्थांना शैक्षणिक योजनांचा फायदा होईल या उद्देशाने पालकांसाठी योजनांचा महाजागर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला गेला . सिंधुदुर्ग जिल्ह्यचे योजना शिक्षणाधिकारी आदरणीय कुडाळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाचे प्रोत्साहन मिळाल्या नंतर प्रत्यक्ष विद्यामंदिर प्रशालेत शासनाच्या सर्व योजना पाचवी ते दहावीच्या पालकांना समजून सांगण्यात देण्यात आल्या यावेळी प्रास्तविक व उपस्थित पालकांचे स्वागत जेष्ठ शिक्षक श्री अच्युतराव वणवे सरांनी केले मुख्याध्यापक श्री पिराजी कांबळे सरांनी सर्व शासकीय योजना सर्व शिष्यवृत्ती योजना व कोणत्या योजनेला कोणती कागद पत्रे असावीत तसेच योजनांचे व शिष्यवृत्तीचे निकष पात्रता या विषयी सविस्तर माहिती पालकांना करून दिली . प्रशालेच्या लिपिक सौ मनिषा पाटील यांनी सर्व योजनांचे ऑनलाईन फॉर्म भरतांना येणाऱ्या अडचणी कोणत्या असतात या विषयी पालकांना मार्गदर्शन केले तसेच पालकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना कागपत्रे आणि वेबसाईड वर फॉर्म भरतांना येणाऱ्या समस्येवर मार्गदर्शन केले . श्री जनार्दन शेळके सरांनी शालेय शिस्तीचे महत्व या विषयी पालकांना मार्ग दर्शन केले . यावेळी पालकांनी शासकीय विविध योजना समजून घेऊन समाधान व्यक्त केले पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे पालक बहुसंख्येने उपस्थित होते प्रशालेचे शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित् होते आभार पर्यवेक्षिका सौ वृषाली जाधव मॅडम यांनी मानले .