*कोकण Express*
*वागदेचा पट्या जगात भारी…..!*
*अडीच मिनिटात २०० हुन अधिक विषाणूंची नावे तोंडपाठ..!
वागदेचा पट्या जगात भारी…..!*
*सिंधुदुर्गच्या ८ वर्षीय सुपुत्राने कोल्हापुरात रचला जागतिक विक्रम…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
अवघ्या आठ वर्षाच्या वयामध्ये आपल्या बुद्धी चातुर्य आणि हुशारीची ओळख अख्या जगाला करून देणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील वागदे -गावठणवडी गावचा सुपुत्र दुर्वांक गुरुदत्त गावडे हा ठरला आहे.अवघ्या २ मिनिटे ३७ सेकंदांत २०० हुन अधिक मानवी रोगजन्य विषाणूंची नावे न थांबता सांगण्याचा अनोखा विक्रम ८ वर्षांच्या दुर्वांक गुरुदत्त गावडे याने केला आहे . त्याच्या या विक्रमाची नोंद इंडिया व एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे .
कोल्हापूर येथे शिक्षण घेणाऱ्या दुर्वांक गावडे यांच्या यशाने सिंधुदुर्गची मान उंचावली आहे.
कणकवली तालुक्यातील वागदे गावचे रहिवाशी असलेले गावडे कुटूंबीय गेल्या तीन वर्षापासून नोकरी निमित्ताने कोल्हापूर येथे स्थायिक झाले आहेत. कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात ( सीपीआर ) परिचारिका असणाऱ्या आई वंदना गावडे व खासगीवाहक असणारे वडील गुरुदत्त गावडे यांच्या प्रोत्साहनाने दुर्वांकने या उपक्रमाची तयारी केली.
शांतिनिकेतन शाळेत इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या आणि अंबाई टँक परिसरात राहाणाऱ्या चिमुकल्या दुर्वांकने कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये या विक्रमाची तयारी केली . विज्ञान विषयातील तज्ज्ञ डॉ . संजीवनी माने यांच्या मार्गदर्शनाखाली रोगजनक विषाणूंच्या नावांचे संकलन करण्यासाठी गुगल तसेच विज्ञानाची पुस्तकांचे संदर्भ घेतले . सुमारे २०० विषाणूंची यादी तयार केली . या नावांचे पाठांतर करून ती अवघ्या २ मिनिटे ३७ सेकंदांत म्हणून दाखवत हा अनोखा विक्रम केला . याबद्दल प्रजासत्ताकदिनी त्याचा गौरव कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते झाला.
कोरोनासारख्या महाभयंकर महामारीमध्ये
मानवी रोगजनक विषाणूंचे संकलन करण्याची संकल्पना त्यांच्या मनात आली.आणि या कामासाठी त्याने पूर्ण वाहून घेतले..
काहीतरी सिद्ध आणि साध्य करायचं या हेतूने झपाटलेला दुर्वांक , विषाणूंच्या नावाचे संकलन करू लागला.त्यासाठी त्याने गुगल तसेच विज्ञानाची पुस्तके ,विज्ञान विषयातील विविध मान्यवरांचे मार्गदर्शन यांच्या मदतीने तब्बल २०० विषाणूंची यादी तयार केली. या विषाणू ची यादी बनवण्यासाठी दोन ते तीन आठवडे कालावधी लागला.सदर विषाणूंची नावे इतकी अवघड आहेत. ही अवघड नावे लक्षात ठेवून २ मिनिटे ३७ सेकंदमध्ये सांगून विश्वविक्रम केला.
सिंधुदुर्गचा बहुमान
दुर्वांक गुरुदत्त गावडे हा कणकवली तालुक्यातील वागदे गावचा सुपुत्र आहे.दुर्वांकचे आई वडील नोकरी निमित्ताने कोल्हापूर येथे स्थायिक झाले आहेत. कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात ( सीपीआर ) परिचारिका म्हणून आई वंदना गावडे व खासगीवाहक म्हणून वडील गुरुदत्त गावडे हे काम करतात.दुर्वांकच्या यशाचे कौतुक कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले…