राज्य परिवहन महामंडळाने माल वाहतुकीच्या दरात केली वाढ – पहा कसे आहेत नवे दर

राज्य परिवहन महामंडळाने माल वाहतुकीच्या दरात केली वाढ – पहा कसे आहेत नवे दर

*कोकण Express*

 *राज्य परिवहन महामंडळाने माल वाहतुकीच्या दरात केली वाढ – पहा कसे आहेत नवे दर*

तसे पहिले तर , राज्य परिवहन महामंडळाकडून सुरवातीला , माल वाहतुकीसाठी प्रति किलोमीटर 38 रुपये दर ठरविण्यात आला होता

आता नवीन आदेशानुसार डिझेलच्या दरात वाढ झाल्याने , माल वाहतुकीच्या दरात प्रति किलोमीटर चार रुपयांनी वाढ केली आहे

▪️ *पहा कसे आहेत नवीन दर ?*

नवीन दरात तीन टप्पे करण्यात आले आहेत त्यानुसार , 100 किलोमीटरपर्यंत 42 रुपये प्रति किलोमीटर दर ठरविण्यात आला आहे.

तर 101 ते 250 किलोमीटरपर्यंत 40 रुपये प्रति किलोमीटर आणि 251 किलोमीटरच्या पुढे 38 रुपये प्रति किलोमीटर दर निश्‍चित करण्यात आला आहे

त्यानुसार राज्यात आता 100 किलोमीटरच्या आत मालवाहतूक करणाऱ्या एसटी बससाठी प्रति किलोमीटर चार रुपये अतिरिक्त मोजावे लागतील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!