*कोकण Express*
*तांबोळी येथे घरावर माड कोसळला*
*बांदा ः प्रतिनिधी*
तांबुळी – खालचीवाडी येथील कृष्णा गोविंद सावंत यांच्या घरावर माड उन्मळून पडल्याने नुकसान झाले आहे. घराच्या दर्शनी भागासह पत्र्याची पडवी व लगतच्या गोठ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात पत्रे, मंगलौरी कौले, वासे व अन्य सामानांची नासधूस झाली आहे. या दुर्घटनेत सावंत यांचे सुमारे १ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सोमवारी सकाळी महसुल प्रशासनाकडून नुकसानीचा पंचनामा करण्यात येणार असून त्यानंतर नेमका नुकसानीचा आकडा प्राप्त होणार आहे. याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते महेश सावंत यांनी दिली.