उबाठा सेनेचे बाळा वराडकर यांनी केला भाजपात प्रवेश

उबाठा सेनेचे बाळा वराडकर यांनी केला भाजपात प्रवेश

*कोंकण Express*

*उबाठा सेनेचे बाळा वराडकर यांनी केला भाजपात प्रवेश*

*कणकवली रिक्षा संघटनेचे अध्यक्ष म्हणून बाळा वराडकर यांचे काम उल्लेखनीय*

*आमदार नितेश राणे यांच्या क्रियाशीलतेवर प्रभावित होऊन केला पक्ष प्रवेश*

*कणकवली ः प्रतिनिधी*

उबाठा सेनेचे जिल्हाध्यक्ष संदेश पारकर यांचे समर्थक आणि कणकवली रिक्षा संघटनेचे अध्यक्ष श्री.बाळा वराडकर यांनी आमदार नितेश राणे यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रेरित होऊन भारतीय जनता पार्टी पक्ष प्रवेश केला. बाळ वराडकर यांचे आमदार नितेश राणे तसेच माजी आमदार तथा लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख प्रमोद जठार यांनी भाजपा स्वागत केले.
कणकवली शहरात बाळा वराडकर यांचे सामाजिक कार्य मोठे आहे रिक्षा संघटनेच्या माध्यमातून ते विविध उपक्रम घेत असतात. अशा या सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या कार्यकर्त्याने भाजपमध्ये प्रवेश करून उबाठा सेनेला फार मोठा धक्का दिला आहे.
या पक्षप्रवेशावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत,
युवक जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री,माजी उपनगराध्यक्ष बंडू हरणे भाजपचे शहराध्यक्ष अण्णा कोदे, प्रदेश सदस्य प्रज्ञा ढवण,माजी सरपंच बबलू सावंत, भरत तळवडेकर, विजय गावडे, महेश आंबडोस्कर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!