विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला ठरली पर्यावरण दूत

विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला ठरली पर्यावरण दूत

*कोंकण Express*

*विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला ठरली पर्यावरण दूत*

*कासार्डे प्रतीनिधी : संजय भोसले*

विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला ही पर्यावरण जोपासणारी आणि संवर्धन करणारी प्रशाला आहे . प्रशालेमध्ये पर्यावरण विभाग व राष्ट्रीय हरित सेना विभाग कार्यरत आहेत नगरपंचायत कणकवली आणि विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने समाज प्रबोधनाचे वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात आले . वृक्ष लागवडी संदर्भात लोकजागृती करून पडीक जमिनित विद्यार्थी व लोक सभागातून अनेक जंगली वृक्षांची सामाजिक वनिकरणांच्या साथीने वृक्ष लागवड करण्यात आली . भारतीय पारंपरिक सणांचे महत्व ओळखून पर्यावरण विभाग प्रमूख श्री राणे सर यांनी नागपंचमीच्या सणाला विविध वृक्षांच्या बिजांचे रोपण मूर्ती मध्ये करून वृक्ष लागवडीचा संदेश समाजापर्यंत पोहचविला . तसेच पारंपरिक पद्धतीचे निसर्गातील साधनांचा वापर करून आकाश कंदिल तयार करून त्यांचे प्रदर्शन प्रशालेत भरविण्यात आले त्यांच्या विक्रीतीतून जीवन कौशल्याचे शिक्षण विद्यार्थांना प्राप्त झाले . पर्यावरण पुरक राखी तयार केली त्यांचेही भव्य प्रदर्शन व विक्रीकरून चरितार्थाचे साधन तयार करून अर्थ साहाय्यास मदत झाली . नैसर्गिक रंगपंचमी हा एक अनोखा उपक्रम प्रशालेत राबविण्यात आला . रासायनिक रंगामुळे विविध आजारांचा फैलाव होतो निसर्ग निर्मित रंगामुळे आरोग्य चांगले रहाते यांचा संदेश समाजात दिला गेला . तसेच उन्हाळ्यांच्या दिवसात पाणी पुरवठा तुरळक असतो निर्गात पाण्याचा साठा नसतो यावेळी पक्षांना पाणी मिळत नाही त्यांना अन्न धान्य निसर्गात उपलब्ध होत नाही म्हणून प्रशालेच्या पर्यावरण विभागाने टाकावू वस्तू पासून विविध वस्तू तयार करून पशू पक्षांना घरटी तयार केली आणि पाण्याची व्यवस्था करून जैविक विविधतेला आधार दिला लोक जागृती चळवळ मोठ्या प्रमाणात राबवून पक्षी वाचवा अभियान राबविण्यात प्रशाला यशस्वी झाली . तसेच परसबाग आणि गांडूळ खत निर्मिती प्रकल्प विद्यार्थ्यांच्या सहाकार्याने . यशस्वीपणे राबवून सेंद्रीय खत निर्मिती प्रकल्पक तयार केला वाडीवस्तीत जागृती निर्माण करून महत्व विषद केले . तृणधान्य व रान भाजी प्रदर्शन भरवून विद्यार्थी व पालक यांना जीवन सत्वाचे महत्व सांगण्यात आले . पर्यावरण विभागाने स्वच्छ कणकवली अभियानात सहभाग घेऊन प्लॅस्टिक मुक्त कणकवली चळवळ राबवून यशस्वी केली मेरी माठी मेरा देश अभियान यशस्वी रित्या राबवून समाज प्रबोधन केले . या सर्व लोक प्रबोधनात प्रशालेचा पर्यावरण विभाग सक्रीयरित्या कार्यरत राहिला विविध उपक्रम यशस्वी करण्यासाठी श्री प्रसाद राणे सर , राष्ट्रीय हरितसेना विभाग प्रमुख सौ शिरसाट मॅडम श्री नागभिडकर सर तसेच मुख्याध्यापक श्री पीजेकांबळे सर पर्यवेक्षिका सौ जाधव मॅडम श्री वणवे सर . या सर्व उपक्रमाला पाठबळ देणारे शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ साळुंखे मॅडम सचिव श्री विजयकुमार वळंजू साहेब अध्यक्ष श्री तवटे साहेब व सर्व संस्था पदाधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले त्यांच्या सहकार्याने प्रशालेला पर्यावरण दूत हा मानाचा पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!