प्रत्येकाचे घर हे योगाचे केंद्र व्हायला हवे-प्रमोद जठार

प्रत्येकाचे घर हे योगाचे केंद्र व्हायला हवे-प्रमोद जठार

*कोंकण Express*

*प्रत्येकाचे घर हे योगाचे केंद्र व्हायला हवे-प्रमोद जठार*

*जागतिक महिला दिनानिमित्त कासार्डेत मोफत महिला योग शिबीरात प्रतिपादन*

*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*

आयुष्य म्हणजे दोन श्वासामधील अंतर असून नियमितपणे म्हणजे अगदी शेवटचा श्वास टिकेपर्यंत योग – प्राणायाम करत रहावे.योगामुळे अनेक विकार आपोआपच दूर होऊन जातात. जीवनात आपण इतर बाबींना फार वेळ देतो त्यापैकी किमान 20 मिनिटे तरी आपण आपल्या शरीरासाठी वेळ द्यायला हवा. जगात भारतीय संस्कृती खूप महान आहे, योगासारखी देणगी भारतीयानी संपूर्ण जगाला दिलेली असून,निरोगी आणि निरामय जीवन जगण्यासाठी प्रत्येकाचे घर हे योगा केंद्र बनायला हवे असे प्रतिपादन माजी आमदार तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद जठार यांनी कासार्डे येथे महिला शिबिर प्रसंगी केले.
ते,गॅलॅक्झी योगा प्राणायाम, फिटनेस अॅन्ड कल्चरल सेंटर तर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कासार्डे दशक्रोशीतील महिलांसाठी अभिषेक मंगल कार्यालय कासार्डे तिठा येथे मोफत योग शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून महिलांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर शिबीराचे मुख्य मार्गदर्शक तथा राज्य योगा प्रशिक्षक संजय भोसले,आयडियल ज्युदो कराटे जिल्हा असोसिएशन संस्थापक दत्तात्रय मारकड,योग शिक्षिका कु. प्रियंका सुतार,योग शिक्षक साईप्रसाद बिजीतकर,योग शिक्षिका कु. तेजल कुडतरकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मार्गदर्शक संजय भोसले यांनी केले.
प्रमोद जठार पुढे म्हणाले की,योग हा एक दिवसासाठी न करता अनंत काळ करत रहा तरच त्याचा फायदा आपल्या शरीरासाठी होत राहिल. महिलांनी आपल्या व्यस्त जीवनातही निरोगी आणि निरामय जीवन जगण्यासाठी योगा करणे गरजेचे आहे असे आवाहन त्यांनी याप्रसंगी उपस्थित महिलांना केले.
या शिबिराला कासार्डे दशक्रोशीतील बहुसंख्य महिलानी उपस्थिती दर्शविली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!