*कोकण Express*
*भाजपचा नगराध्यक्ष असून मी कट्टर राणे समर्थक*
*नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सुशांत नाईक यांची ऑफर फेटाळली*
*कणकवली ः प्रतिनिधी*
मी कट्टर राणेसमर्थक, भाजपचा नगराध्यक्ष आहे.शिवसेना प्रवेशासाठी दरवाजे उघडे आहेत असे मला सांगणाऱ्या विरोधी गटनेते सुशांत नाईक यांनी त्यांचे दरवाजे वेळीच बंद करावेत. जनतेत संभ्रम पसरवून शिवसेनेत आपले वजन वाढविण्याचा नाईक यांनी प्रयत्न करू नये असा टोला कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सुशांत नाईक यांना लगावत सुशांत नाईक यांची ऑफर फेटाळली.
नगराध्यक्ष दालनात पत्रकार परिषदेत नलावडे बोलत होते. सुशांत नाईक यांनी दिलेल्या शिवसेना प्रवेशाची ऑफर धुडकावत पक्ष प्रवेशाच्या चर्चेला नलावडे यांनी पूर्णविराम दिला. कणकवली शहरात जनतेमध्ये व कणकवलीच्या राजकारणामध्ये माझ्याबद्दल संभ्रम निर्माण करून आपले वजन वाढवण्याचा सुशांत नाईक यांचा प्रयत्न आहे. मी माझ्या भूमिकेशी कायम ठामच आहे. दबाव व दडपण हे शब्द समीर नलावडेंच्या डिक्शनरी मध्ये येत नाहीत. कालच्या पत्रकार परिषदेत भाजी मार्केट विषयावर न बोलता माझ्या भूमिकेबाबत बोलणाऱ्या सुशांत नाईक यांनि त्यांची व्यवसायिक भूमिका तपासून पहावी असा टोला नलावडे यांनी लगावला.
सुशांत नाईक म्हणत असलेली भाजी मार्केट नगरपंचायत ने विकसित करण्याची त्यांची भूमिका ही त्यांनी आपल्या पालकमंत्र्यांना मार्फत निधी आणून पूर्तता करावी. केवळ तोंडाच्या बाता मारून आरक्षणे विकसित होत नाहीत. मी माजी मुख्यमंत्री नारायण राणे आमदार नितेश राणे व भाजपा पक्षाचा कट्टर कार्यकर्ता आहे माझ्या पक्षाशी मी ठाम आहे. त्यामुळे नाईक यांनी आपले दरवाजे घट्ट बंद करून ठेवावेत. अन्यथा त्यांच्याकडचे सगळे बाहेर येऊन त्यांचे घर रिकामे होईल असा टोला नलावडे यांनी लगावला. ४ जानेवारी रोजी च्या नगरपंचायत बैठकीत भाजी मार्केट बाबत मी भूमिका मांडली. ती मुख्याधिकारी व प्रशासनाला समजली. यामुळे भाजी मार्केट या विषयासंदर्भात पुन्हा मला भूमिका मांडण्याची आवश्यकता नसल्याचे नलावडे यांनी प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. तसेच गुन्हा दाखल करणे हे काम मुख्याधिकाऱ्यांचे असते असे नलावडे यांनी सांगितले. राजन तेली व माझ्यात पक्षीय वाद नाहीत मला नगरपंचायत च्या हिताचे जे विषय वाटले ते मी मांडले. असेही नलावडे एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले. त्यामुळे नारायण राणे नितेश राणे ज्या पक्षात असतील त्या भाजपा पक्षाचा मी कार्यकर्ता असल्याचे नलावडे यांनी सांगितले. भालचंद्र महाराज संस्थान शेडच्या उद्घाटन प्रसंगी भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या स्वागतासाठी आम्ही नियोजनात असल्यामुळे या शुभारंभाच्या कार्यक्रमाला जाता आले नाही. मात्र नगरपंचायतने या शेडसाठी ना हरकत दिली. या कामाचा प्लान पुन्हा रिव्हाईज झाला तो देखील कायद्यात बसून परवानगी दिली. त्यामुळे संस्थांना साठी आम्ही सर्वतोपरी मदत करणार असे नलावडे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. तसेच जर विकासकाच्या विरोधात मुख्याधिकार्यांनी कायद्याने कारवाई केली तर याप्रश्नी कुणालाच पाठीशी घालण्याचा प्रश्न येत नाही. कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे मुख्य अधिकाऱ्यांचे अधिकार आहेत असे नलवडे यांनी स्पष्ट केले.