व्हॉईस ऑफ मीडिया’चा 2023 चा पुरस्कार वितरण समारंभ दि. 26 रोजी (सोमवारी) मुंबईत होणार संपन्न

व्हॉईस ऑफ मीडिया’चा 2023 चा पुरस्कार वितरण समारंभ दि. 26 रोजी (सोमवारी) मुंबईत होणार संपन्न

*कोंकण Express*

*व्हॉईस ऑफ मीडिया’चा 2023 चा पुरस्कार वितरण समारंभ दि. 26 रोजी (सोमवारी) मुंबईत होणार संपन्न…*

*संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन….*

*मुंबई ः संजना हळदिवे*

*_व्हॉईस ऑफ मीडिया’चा पुरस्कार वितरण समारंभ सोमवारी मुंबईत होणार_*
*_व्हॉईस ऑफ मीडिया राज्य उत्कृष्ट पदाधिकारी अवॉर्ड २०२३ घोषित केला_*
*_नेपाळमध्ये भरलेलं ‘वर्ल्ड सोशल फोरम’ व्हॉईस ऑफ मीडियाचा मोठा स्टॉल_*
*_लहुजींच्या विचारांची देशाला गरज :- डॉ सचिन साबळे_*
*_राज्य शासन, व्हॉईस ऑफ मीडियाचा उपक्रम …..महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर_*
*_सर्वोच्च न्यायालयाने इलेक्टोरल बॉण्ड योजना केली रद्द_* *_संविधानातील अनुच्छेद 19 (1)अ अंतर्गंत अधिकारांचे उल्लंघन_*
*_उरण शिवजयंतीच्या अध्यक्षपदी आशिष गोवारी यांची निवड_*
*_संविधान उद्देशिका वाटप. ……योगेश येलवेंचा स्तुत्य उपक्रम_*
*_अजिंक्य युवा प्रतिष्ठान मुंबईतर्फे “इंडियन आयकॉन अवॉर्ड- २०२४” साठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन_*
*_‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या लढ्याला मोठे यश….. साखळी उपोषण ठरले पत्रकारांसाठी नवसंजीवनी_*

‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार, पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2023 व उत्कृष्ट पदाधिकारी पुरस्कार 2023 चा वितरण समारंभ मुंबईत सोमवारी (ता. 26) राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, शालेय शिक्षण मंत्री, मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री मुंबई शहर मा. नामदार दीपकभाई केसरकर यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याला राज्यभरातील पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे व प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी केले आहे. राज्य शासन, व्हॉईस ऑफ मीडिया, शेठ ब्रिज मोहन लढ्ढा सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेठ ब्रिजमोहन लढ्ढा सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आशीष लढ्ढा राहणार असून या कार्यक्रमाला युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार, परभणीचे आमदार राहुल पाटील, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड, सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक सम्राट फडणीस, विचारवंत नामदेव भोसले व आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्राचे प्रमुख ओमप्रकाश शेटे यांची उपस्थिती राहणार आहे. मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर, मंत्रालयासमोर सायंकाळी साडेचार वाजता हा कार्यक्रम सुरू होईल. व्हॉईस ऑफ मीडियाच्या व प्रदेश,विभाग, जिल्हा, तालुका पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्य कार्याध्यक्ष तथा मुख्य संयोजक योगेंद्र दोरकर, व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्य उपाध्यक्ष अजितदादा कुंकूलोळ यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!