*कोंकण Express*
*कासार्डे तांबळवाडीतील शालेय सेल्फी पॉइंट सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैशिष्ट्यपूर्ण : संजय देसाई*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
आमच्या शाळेला मदत करणे हे आमचे कर्तव्यच आहे. या शाळेची वाटचाल उत्तम चालू असून विविध उपक्रमांमधून दिसून येते. कासार्डे तांबळवाडी शाळा ही वैशिष्ट्यपूर्ण असून त्याबद्दल समाधान वाटते, असे प्रतिपादन माजी जि. प. सदस्य संजय देसाई यांनी केले.
कासार्डे येथील जि.प.प्राथमिक शाळा तांबळवाडीच्या सेल्फी पॉइंट उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी सरपंच निशा नकाशे,जिल्हा नियोजन समिती सदस्य सुधीर नकाशे, उद्योगपती नामदेव बांदिवडेकर,शांतीनाथ लडगे, प्राणिल शेटये,माजी सरपंच संतोष पारकर, उपसरपंच गणेश पाताडे ,केंद्र प्रमुख संजय पवार,ग्रा. प सदस्य अभिजित धुमाळ, श्रध्दा शेलार,जयवंती जमदाडे, पोलीस पाटील महेंद्र देवरूखकर,सोसायटी चेअरमन दिपक सावंत,श्रीपत पाताडे,नारायण घाडी,विद्याधर नकाशे,राजकुमार पाताडे, उदय पाटील,ग्रामसेवक निलेश पाताडे, मुख्याध्यापक निलेश ठाकूर, जगदीश गोसावी, भाई पाटील,जाकीर शेख,सत्यवान केसरकर,अनिल जमदाडे,निकिता ठाकूर,शा.व्य समिती अध्यक्ष गुरुनाथ पाताडे,उपाध्यक्ष शीतल साईम,चंद्रकांत पाताडे,शांताराम जाधव,बाबल्या कदम आदी उपस्थित होते.त्याच प्रमाणे या सेल्फी पॉइंट साठी उपसरपंच गणेश पाताडे,सतीश उर्फ भाई साळसकर,उदय निकम,कासार्डे हायस्कूलचे शिक्षक सागर पांचाळ ,नवनाथ कानकेकर याचे विशेष सहकार्य लाभले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. विनायक पाताडे यांनी मानले

