कणकवली, देवगड व वैभववाडी मतदारसंघातुन २३८ रामभक्त जाणार अयोध्येला

कणकवली, देवगड व वैभववाडी मतदारसंघातुन २३८ रामभक्त जाणार अयोध्येला

*कोंकण Express*

*कणकवली, देवगड व वैभववाडी मतदारसंघातुन २३८ रामभक्त जाणार अयोध्येला*

*अयोध्येला जाण्यासाठी पनवेल ते अयोध्या विशेष रेल्वे गाडी सोडणार*

*राम भक्तांसाठी आयोध्या वारी घडविण्यास आ. नितेश राणे यांनी दिली मोफत सेवा*

*कणकवली ः संजना हळदिवे*

कणकवली, देवगड व वैभववाडी मतदारसंघातुन २३८ रामभक्त अयोध्येला जाणार आहेत. भाजपा प्रदेश कार्यालयाकडून अयोध्येला जाण्यासाठी पनवेल ते अयोध्या विशेष रेल्वे गाडी सोडण्यात येणार आहे. या गाडीतून रामभक्तांना अयोध्या वारी घडविण्यात येणार आहे. त्यासाठी आमदार श्री. नितेशजी राणे साहेब यांनी मतदारसंघातुन अयोध्येसाठी जाणाऱ्या राम भक्तांसाठी मोफत सेवा दिली आहे. दि. ८-२-२०२४ रोजी सकाळी ७.०० वाजता नांदगाव ते पनवेल लक्झरी गाडी सोडली आहे. तसेच प्रवासामध्ये अत्यावश्यक लागणारी औषध, थंडी वाऱ्याचे साहित्य आपल्या सोबत घ्यावयाचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!