माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत रक्त तपासणी शिबीर संपन्न

माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत रक्त तपासणी शिबीर संपन्न

*कोंकण Express*

*माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत रक्त तपासणी शिबीर संपन्न.*

*कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे विद्यमान अध्यक्ष सन्मा. श्री. सतीश सावंत यांच्या ५९ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई, ज्ञानदा एज्युकेशन ट्रस्ट हरकुळ बुद्रुक आणि महालॅब आरोग्य विभाग सिंधुदुर्ग यांच्या वतीने मोफत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत वार शनिवार दिनांक- ३ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ९:०० ते दुपारी १:०० या वेळेत रक्त तपासणी शिबिर घेण्यात आले.*

*सदर रक्त तपासणी शिबीरासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र,कनेडी. महालॅब आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि ज्ञानदा एज्युकेशन ट्रस्ट बुद्रुक चे अधिकारी यांनी यशस्वीपणे शिबिर संपन्न केले. या शिबिराचा लाभ प्रशालेतील शिक्षक,विद्यार्थी त्यांचे पालक तसेच भिरवंडे, सांगवे या पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी घेतला.*

*या रक्त तपासणी शिबिराचे उद्घाटन प्रमुख पाहुणे सन्मा. श्री.प्रदीप कुमार कुडाळकर साहेब ( शिक्षणाधिकारी प्राथमिक जि.प.सिंधुदुर्ग) यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आले. कार्यक्रमाचे कार्यक्रमाध्यक्ष सन्मा.श्री. सतीशजी सावंत (अध्यक्ष,क.ग.शि.प्र.मंडळ, मुंबई) प्रमुख उपस्थिती सन्मा. श्री.थोरात साहेब (उपशिक्षणाधिकारी सिंधुदुर्ग),सन्मा.श्री.किशोर गवस (गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कणकवली) तसेच सन्मा.श्री.आर.एच.सावंत, (शालेय समिती चेअरमन), सन्मा.श्री.व्ही.बी.सावंत,सन्मा.श्री. तुषार सावंत, सन्मा. श्री बावतीस घोन्सालविस, संस्थेचे सर्व पदाधिकारी,शालेय समितीचे सदस्य उपस्थितीत होते.प्रशालेचे पर्यवेक्षक सन्मा.श्री. बयाजी बुराण, तसेच प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थ्यी व शिबीराचे लाभार्थ्यी उपस्थित होते.*

*या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय प्रदीप कुमार कुडाळकर साहेब यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे लक्ष वेधले. दैनंदिन जीवनामध्ये विद्यार्थ्यांनी मोबाईलचा सुयोग्य वापर करावा, डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी आणि आपल्या परिवारातील व्यक्तींनाही मोबाईलचे दुष्परिणाम समजून सांगावेत. विद्यार्थी जीवनामध्ये अपयश हे नेहमी येत असतात पण विद्यार्थ्यांनी अपयशी न होता सातत्याने प्रयत्नशील राहावे.*

*कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सन्माननीय श्री. सुमंत दळवी यांनी केले. तर सूत्रसंचालन व आभार माध्यमिक विभागातील सहा. शिक्षक श्री. प्रसाद मसुरकर यांनी केले.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!