*कोंकण Express*
*कालवीबंदर येथे ९ ते १७ एप्रिलला सामाजिक नाट्य स्पर्धा*
*नवतरुण उत्साही नाट्य, कला, क्रीडा मंडळाचे आयोजन*
*वेंगुर्ले ः प्रतिनिधी*
नवतरुण उत्साही नाट्य, कला, क्रीडा मंडळ कालवीबंदर, विठ्ठल-रखुमाई उत्सव कमिटी व कालवी ग्रामस्थांतर्फे ९ ते १७ एप्रिल या कालावधीत विठ्ठल- रखुमाई मंदिर कालबीबंदर येथे सलग विसाव्या वर्षी सिंधुदुर्ग व गोवा मर्यादित सामाजिक नाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्या नाट्यसंघास २० हजार रुपये, द्वितीय व क्रमांकास १५ हजार रुपये, तृतीय १० हजार रुपये तसेच फिरता व कायमस्वरुपी चषक देण्यात येणार आहे. तसेच या सामाजिक नाट्य स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प त्येक संघास ७ हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. तसेच वैयक्तिक बक्षिसे व कायमस्वरुपी चषक देण्यात येणार आहेत.
या नाट्यस्पर्धेत प्रथम नावनोंदणी करणाऱ्या ७ नाट्य संघानाच सहभाग देण्यात येणार आहे. या सामाजिक नाट्य स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या नाट्य मंडळांनी दि. 5 फेब्रुवारी पर्यंत नावे नोंदवावीत. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी मंडळाचे अध्यक्ष आपा ताम्हणकर (८२७५७७३५१४) येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.