*कोंकण Express*
*सप्तरंगी तस्करी मध्ये वनविभागाच्या एका अधिकाऱ्याचा हात*
.*..याला अभय देणारा एक निवृत्त वरिष्ठ अधिकारी*
काही दिवसापूर्वी पणदूर तालुका कुडाळ मध्ये पकडलेला अनाव मधील फॉरेस्ट मधील सप्तरंगी माल मालकी क्षेत्रातील दाखवून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला गेला. याच्यामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अनेक अधिकारी व कर्मचारी सामील असून, याची सखोल चौकशी होण्याची गरज
आहे. या प्रकरणांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक रिटायर अधिकारी सुद्धा सामील आहे याची चौकशी होणे सुद्धा गरजेची आहे जिल्ह्याचे उपवनसंरक्षक यांनी लक्ष घालून सप्तरंगीच्या तस्करीच्या प्रकरणाची सखोल चौकशी करून वनविभागाला न्याय द्यावा. अन्यथा 26 जानेवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री. व त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी. यांना निवेदन देणार आहोत. असे कणकवली राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष. श्री अनंत पिळणकर, यांनी म्हटले आहे