*आ. नितेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या नवीन कुर्ली

*आ. नितेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या नवीन कुर्ली

*कोंकण Express*

*आ. नितेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या नवीन कुर्ली येथील रस्ता डांबरीकरण कामाचे भुमिपूजन संपन्न*

▪️ *माजी सभापती मनोज रावराणे यांचे विशेष प्रयत्न*

कणकवली तालुक्यातील नवीन कुर्ली येथील अंतर्गत रस्ता शिवाजी चव्हाण ते विजय राणे तसेच शिवराम पोवार ते संदीप सूद यांच्या घरापर्यंत जाणा-या रत्याचे डांबरीकरणे या कामाचे आज भूमिपूजन करण्यात आले.
आ. नितेश राणे यांच्या माध्यमातून तसेच कणकवली माजी सभापती मनोज रावराणे यांनी विशेष प्रयत्न आणि नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाने पाठपुरावा करून सुमारे १० लाख रुपये रस्ता डांबरीकरण साठी मंजूर करून दिले.
मंजुर केलेल्या कामाचे भुमिपूजन मा. सभापती मनोज रावराणे यांच्या शुभहस्ते पार पडले. या प्रसंगी लोरे सरपंच अजय रावराणे ,नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कोलते, उपाध्यक्ष सुरज तावडे ,सचिव धीरज हुंबे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमित दळवी, शिवराम पवार, कृष्णा परब ,कुर्ली उत्कर्ष मंडळाचे सचिव दिलीप शां पाटील ,जनार्दन पवार ,अनंत दळवी ,शांताराम पार्टे ,प्रकाश दळवी, शशिकांत परब ,चंद्रकांत तेली ,अरुण पवार ,अंकुश दळवी, विजय राणे , प्रकाश आग्रे, पांडुरंग कोलते, महेश चव्हाण ,विजय कोलते ,वसंत येंडे ,कल्पेश कदम,अतुल डऊर, मंगेश मडवी, सचिन साळसकर, सचिन परब,शुभम तावडे,प्रसाद कोलते,सुजल सावंत, अनिल दळवी,सुरेंद्र पवार,शिवाजी चव्हाण, तसेच नवदुर्गा युवा मंडळाचे सर्व पदाधिकारी गावातील ग्रामस्थ तसेच महिला वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती.
तसेच थोड्याच दिवसापूर्वी नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाने नवीन कुर्ली येथील मुख्य रस्ता डांबरीकरण, शाळेसाठी बोअरवेल,रेशन दुकान, शाळेच्या दुरुस्तीचे काम अशी अनेक कामे या विभागाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय नितेशजी राणे साहेब यांच्याजवळ पाठपुरावा करून मंजूर करून घेऊन एका पाटोपाट विकास कामांचा धडाकाच सुरू ठेवल्यामुळे ग्रामस्थांकडून आमदार नितेशजी राणे साहेब तसेच नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाचे कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!