हुंबरठ ओव्हरब्रिजवर व्हॅगनार कारचा अपघात ; चालक जागीच ठार

हुंबरठ ओव्हरब्रिजवर व्हॅगनार कारचा अपघात ; चालक जागीच ठार

*कोंकण Express*

*हुंबरठ ओव्हरब्रिजवर व्हॅगनार कारचा अपघात ; चालक जागीच ठार*

*चिमुकली मुलगी सुदैवाने बचावली*

*कणकवली ः प्रतिनिधी*

मुंबई – गोवा महामार्गावर हुंबरठ ओव्हरब्रिज वर मुंबई हुन गोव्याच्या विरुद्ध दिशेने जाणाऱ्या व्हॅगनर कारला ( एम एच ०३ डीजि ७८९० ) अपघात झाला. या अपघातात चालक जागीच ठार झाला. हा अपघात गुरुवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास कणकवली हुंबरठ येथील ओव्हर ब्रिजवर झाला.

सदरच्या व्हॅगनार कार मध्ये एक महिला, छोटी मुलगी, दोन पुरुष यांचा समावेश होता.

कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव, कॉन्स्टेबल किरण मेथे, कणकवली पोलीस ठाण्याचे वाहतूक पोलीस हवालदार विनोद चव्हाण, होमगार्ड तसेच हायवे ट्राफिकचे आशिष जाधव, सावकार वावरे, दत्ता कांबळे घटनास्थळी दाखल झाले होते तर आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!