*कोकण Express*
*भाजपा च्या वतीने ख्रिस्ती बांधवांना नाताळच्या शुभेच्छा*
ख्रिस्ती धर्मियांच्या नाताळ सणाचे औचित्य साधून भाजपाच्या वतीने वेंगुर्ले तालुक्यात ख्रिस्ती बांधवांना नाताळ च्या शुभेच्छा देण्यात आल्या .
विविधतेने नटलेल्या आपल्या देशात सर्वधर्मीय लोक गुण्यागोविंदाने राहतात आणि सर्वधर्मीयांचे उस्तव – सण मोठ्या उस्ताहाने साजरे केले जातात . ख्रिस्ती धर्मीयांचा नाताळ अर्थात ख्रिसमस हा यापैकी एक सण .नाताळ मुलत: प्रेमाचा संदेश देणारा सण आहे . या नाताळ सणानिमित्त भाजपा जि.का.का.सदस्य मनवेल फर्नांडिस , अल्पसंख्याक सेलचे ता. अध्यक्ष सायमन आल्मेडा , परबवाडा माजी सरपंच ईनासीन फर्नांडिस व उभादांडा माजी सरपंच ईलीहास फर्नांडिस यांच्या निवासस्थानी जाऊन भाजपा प्रदेश का.का.सदस्य शरदजी चव्हाण यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या .
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , मा.नगराध्यक्ष राजन गिरप , जि.का.का.सदस्य वसंत तांडेल ,ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब , सांस्कृतिक आघाडीचे शैलेश जामदार , अणसुर सरपंच सत्यविजय गावडे , आसोली उपसरपंच संकेत धुरी , युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर , मारुती दोडशानट्टी , सोशल मिडीयाचे अमेय धुरी , बुथप्रमुख रविंद्र शिरसाठ व बाळा मळगांवकर , सत्यवान परब , संतोष सावंत , चैतन्य दळवी , ओंकार चव्हाण इत्यादी उपस्थित होते