*कोकण Express*
*गजानन राणे व संदीप दळवी या नव्या दमाच्या दमदार नेतृत्वात कुडाळ मध्ये मनसेचा मेळावा रेकॉर्ड ब्रेक गर्दीत संपन्न*
जेव्हा पासून सन्मा. राजसाहेब ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्हाची धुरा गजानन राणे व संदीप दळवी यांच्या कडे सोपवाल्या पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात नव चैतन्य निर्माण झाले आहे. या दोघानीं सिंधुदुर्ग जिल्ह्यात झंझावाती दौरे करून तळागाळातील कार्यकर्ते व जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केल्या मुळे एक सकारात्मक वातावरण निर्माण झाले. तसेच राज साहेब ठाकरे यांनी रेंगाळलेला मुंबई गोवा महामार्गाबाबत मोर्चे तसेच मनसे स्टाईल आंदोलने करून सराकारला सरकारला सळो की पळो करून सोडले आहे. त्यामुळे इतर प्रस्थापित पक्षानी कोकणी जनतेला विकासाच्या नावाखाली गंडवल्याची भावना कोकणी जनतेते निर्माण होऊन, कोकणी जनता मनसे पक्षाकडे नवनिर्माणासाठी आशेने बघत आहे. कामगार क्षेत्रात नावाजलेले गजानन राणे व संदीप दळवी यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सातत्याने दौरे करून जनतेचे प्रश्न सोडविण्यावर भर दिल्यामुळे, सिंधुदुर्गवासियांना या दोघांच्या रूपाने दमदार नेतृत्व मिळाल्याची भावना आहे. मनसेचा असाच कामांचा धडाका सुरु राहिला तर येणाऱ्या काळात ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्ह्या परीषदेवर मनसेचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही.यावेळी व्यासपीठावर मनसेचे उपाध्यक्ष प्रवीण मर्गज, राजू साटम,नंदू तळवडेकर,सुरेश शिंदे, श्रिया ठाकुर,मोनिका फर्नांडिस,धीरज परब, श्रेया देसाई,संतोष मयेकर,संतोष शिंगाडे, बाळा पावसकर,घनश्याम परब, पास्कल रॉड्रिग,हेमंत जाधव, ॲड.अनिल केसरकर,चंदन मेस्त्री,गणेश वाईरकर,कुणाल किनळेकर,सचिन सावंत आणि अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.श्री तळवडेकर,मोनिका फर्नांडिस,सुरेश शिंदे,संतोष मयेकर,धीरज परब,अनिल केसरकर,चंद्रशेखर सावंत व अन्य काही पदाधिकारी यांनी मनोगत व्यक्त केले.सूत्रसंचालन बाळा पावसकर यांनी केले.