ड्रग्स माफियांच्या सर्वात जवळचा मित्र मातोश्रीवर तेथे मोर्चा काढा

ड्रग्स माफियांच्या सर्वात जवळचा मित्र मातोश्रीवर तेथे मोर्चा काढा

*कोकण Express*

*ड्रग्स माफियांच्या सर्वात जवळचा मित्र मातोश्रीवर तेथे मोर्चा काढा*

*आमदार नितेश राणे यांचे संजय राऊत यांना आव्हान*

*”चोर की दाढी मे तिनका” आदित्य ठाकरे यांच्या सुशांत सिंग प्रकरणी न्यायलाय गेल्यावर नितेश राणे यांची टीका*

* दहशदवादी काय करु शकतात हे ९३ च्या दंगलीत शरद पवार यांना माहित आहे तरी मतांसाठी हमास ला पाठिंबा*

*ठाकरे ओवेशी सोबत दिसल्यास आश्चर्य वाटायला नको*

*कणकवली ः प्रतिनिधी*

ललित पाटील जेव्हा तोंड उघडेल तेव्हा उबाठा सेनेचे अनेक नेते जेल मध्ये असतील.त्यामुळे नाशिक मध्ये मोर्चा काढण्यापेक्षा एक मोर्चा मातोश्री वर काढावा. कारण ड्रग्स माफियांच्या सर्वात जवळचा मोठा मित्र मातोश्रीवर आहे. सुशांत सिंग प्रकरणात न्यायालयात कॅव्हेट दाखल करणे याला,”चोर की दाढी मे तिनका म्हणतात” सुशांत सिंग, दिशा सालियान ची आत्महत्या होती आणि त्यात आदित्य ठाकरे याचा काही संबद्ध नसेल तर आदित्य ला कोर्टात धाव घेण्याची गरज काय ? त्यामुळे लवकरच योग्य माणसाला शिक्षा मिळणार.असा विश्वास भाजप नेते प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला.
देशाचे पंतप्रधान मोदींजींनी काल इजराईल च्या भूमिकेचं समर्थन केले. त्यावर पवारांनी टीका केली.93 च्या दंगलीच्या काळात दहशदवादी काय करु शकतात हे शरद पवार यांना माहीत असताना फ़क्त मतांसाठी राजकारण करणे योग्य नाही. देशाची आणि जगाची सुरक्षा महत्वाची आहे.हामास ने हल्ला केला त्याचा निषेध करताना आम्ही ठाकरे, पवारांना ऐकलं नाही.याचाच अर्थ जिहादी,आणि धर्मांध दहशत वाद्यांना यांचे समर्थन आहे.अप्रत्यक्ष पद्धतीने पाठिंबा देत आहेत. उद्या ओवेसी च्या रॅलीत हे उद्धव ठाकरे खांद्याला खांदा लावून सहभागी झाले तर आश्चर्य वाटणार नाही. येवढे हे मतांसाठी स्वतःचे विचार विसरलेले आहेत.मतांच्या राजकारणासाठी संजय राऊत मोदींवर टीका करत आहे. त्याची लायकी नाही.अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केली.

टेम्बि नाक्यावर देवीच्या दर्शनासाठी रश्मी ठाकरे गेलेल्या तेव्हा तिकडचा कूलर,एसी बंद झाला. म्हणून जळफळाट झाला मुळात हा नियतीचा खेळ आहे. 2004 ला रंग शारदा मध्ये राणे साहेबांची खुर्ची काढण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी दिलेले. असेच राज ठाकरेंसोबत पण घडलेले.तुम्हीच सोबत काल तोच प्रकार ठाण्यात घडला.ह्याला नियतीचा खेळ म्हणतात. माँ साहेबांनी बोललेला नवस उद्धव ठाकरेंनी पूर्ण केला नाही. तर एकनाथ शिंदेनी तो नवस पूर्ण केला.याची आठवण करून दिली.
आरोप झाल्यावर राजीनामा द्यायचा तर सुशांत सिंग मर्डर प्रकरणात आदित्य ठाकरेचा राजीनामा का घेतला नाही.असा थेट सवाल आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांना विचारला. तर आमच्या मंत्र्यांचा राजीनामा मागण्याचा अधिकार उबाटा नेत्यांना नाही.अशी टीका केली.
संजय राऊत साठी आर्थर रोड जेल ची खोली साफ करण्याचे काम सूरु आहे. लवकरच राऊत साहेब तिकडे जातील.
फडणवीस साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे म्हणूनच तुझ्या मालकाची झोप उडाली आहे.
झोपेच्या गोळ्या खाव्या लागत आहेत.मातोश्री वरचा वाइन चा साठा वाढवून ठेवला आहे.
तुझ्यात हिंमत असेल तर तू पत्राचाळ मध्ये जाऊन दाखव तुला चपलेने ते लोक मारतील असा इशारा दिला.
बॉक्स
निष्ठावंत काँग्रेस वाल्यांनी राहुल गांधींच्या आदेश प्रमाणे लाईट चे बटन सुरू करू नये

जो लाईट च बटन ऑन करेल तो काँग्रेस चा नेता, कार्यकर्ता नाही. तुमचा नेताच म्हणाला आहे.लाईट सुरू केल्यामुळे अदाणीला पैसे जाणार असतील तर काँग्रेस वाल्यांनी लाईट लावू नये आणि राहुल गांधींच्या आदेशाचे पालन करावे.ठाकरे शिवसेना कार्यकारिणी मध्ये निष्ठवाण नाहीत. भांडी, डबे उचलणारे बूट उचलणारे ठाकरेंच्या कार्यकारिणी मध्ये आहेत.अशी सुद्धा टीका यावेळी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!