ग्रामसेवक बनायची लायकी नसलेल्या संजय राऊत ने उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका करू नये

ग्रामसेवक बनायची लायकी नसलेल्या संजय राऊत ने उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका करू नये

*कोकण Express*

*ग्रामसेवक बनायची लायकी नसलेल्या संजय राऊत ने उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका करू नये*

*आमदार नितेश राणे यांची टीका*

*ऊबाठा सेनेच्या न्यायलायातील याचिकांमुळे
मुंबई मनपा निवडणुक अडकली*

*कणकवली ः प्रतिनिधी*

रश्मी ठाकरेंना सामना चे संपादक बनवून, संजय राजाराम राऊत ची लायकी काढली.
ग्रामसेवक बनायची लायकी नसलेला संजय राजाराम राऊत 2019 ला मुख्यमंत्री पदाचे स्वप्न बघत होते.शरद पवार आपलेच नाव चालवणार म्हणून आमदारांना फोन करायला लागला पण याच्या लायकी प्रमाणे 2 ते 3 पेक्षा जास्त आमदार याच्या बैठकीला जमलेच नाहीत, ही संजय राऊत ची लायकी आहे.उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तुमची लायकी ओळखली म्हणूनच संजय राजाराम राऊत चा भाऊ सुनील राऊत ला साधं राज्यमंत्री केलं नाही.त्यामुळे देवेंद्रजी फडणवीस यांच्या बद्दल बोलण्याआधी संजय राजाराम राऊत ने स्वतःची लायकी पाहावी अशी जळजळीत टीका भाजप प्रवक्ते,आमदार नितेश राणे यांनी केली.
दरम्यान शिवसेना आमदार ला उद्देशून तुम्ही मुख्यमंत्री शिंदे साहेबाना किती त्रास देता हे पहा. फडणवीस साहेबांनी काय काम करावे कुठे करावे हे सांगण्या इतके तुम्ही मोठे नाही.
या तिघांना काम करू द्या.तुमच्या बोलण्याचा राऊत,ठाकरे यांना फायदा होईल असे वागू नका असे आवाहन मित्र पक्षाच्या आमदारांना केले.
मुंबई महा नगरपालिका निवडणुकीत ऊबाठा सेनेमुळे लांबत आहे.ऊबाठा सेनेने न्यायलायत टाकलेल्या याचिका मागे घ्या मग निवडणूक आयोग निवडणुका घेतली.मनोज जरंगे पाटील यानी समाजाने काम करावे.
उबाठा चे स्वतःचे चिन्ह नाही पक्ष नाही मग काय करणार त्यांना इंडिया आघाडी शिवाय पर्याय नाही. बाळासाहेब तुझे सुद्धा विठ्ठल होते ना मग त्यांचे घर का फोडले. पवारसाहेब तुमचे होते मग त्याचे घरात फूट का पडली. तूच आग लावून शकुनी मामा सारखी भूमिका करतोस अशी टीका संजय राऊत यांचेवर केली.राऊत तुझी स्क्रिप्ट कुठून येते ?मातोश्री,सिलवर ओक की पवार साहेबांकडून येते हे आधी सांग. नंतर दुसऱ्यावर टीका कर असेही सुनावले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!