उपजिल्हा रुग्णालयात त्वरीत सोयी सुविधा द्या

*कोकण Express*the

*उपजिल्हा रुग्णालयात त्वरीत सोयी सुविधा द्या*

*सावंतवाडी शहर महिला मोर्चाची मागणी*

सावंतवाडी : प्रतिनिधी

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात शासकीय नियमानुसार ज्या सोयी उपलब्ध नाहीत. त्या सोयी तातडीने उपलब्ध कराव्यात, अशी मागणी सावंतवाडी शहर महिला मोर्चाच्या वतीने करण्यात आली.
यावेळी सावंतवाडी शहर मंडल अध्यक्षा मोहीनी मडगांवकर, नेत्रा मूळ्ये, प्रियांका नाईक, बांदा शहर अध्यक्ष अवंती पंडित, मेघना साळगांवकर, मिसबा शेख, निर्मला यादव, प्राजक्ता मुद्राळे, सुकन्या टोपले आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात लागलेल्या आगीत १० बालकांचा गुदमरून दूर्दैवी मृत्यू झाला. जगात पाऊल टाकण्याआधीच जग सोडण्याची वेळ या चिमुकल्यांवर आली हे अत्यंत दुर्दैवी आहे.
या संवेदनशील विषयाला वाचा फोडण्यासाठी भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाच्यावतीने सावंतवाडी तालुक्यातून आरोग्य केंद्र, शासकीय रुग्णालय, प्रसतीगृह व बालरुग्णालय येथे भेट देवून सर्व सोयींची माहिती घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!