*कोकण Express*
*वेंगुर्ले तालुक्यातील खानोली गावात गणेश उत्सवापुर्वी पथदिप सुरू करून भाजपाची वचनपूर्ती*
*केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या खासदार निधीतून खानोली सावंतवाडा व धनगरवाडी येथील पथदिपामुळे रस्ते प्रकाशमान*
केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांनी आपल्या खासदार निधीतून वेंगुर्ले तालुक्यातील खानोली गावातील सावंतवाडा व धनगरवाडी स्ट्रीट लाईट साठी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला . त्यानिधीतुन गणपती पुर्वी पथदिप सुरू करून देऊ , असे अभिवचन कामाच्या शुभारंभ प्रसंगी भाजपा पदाधिकारयांनी गावकऱ्यांना दिले होते. याची वचनपूर्ती करून गणेशचतुर्थी पुर्वी दोन दिवस अगोदरच दोन्ही वाडीतील पथदिप चालू केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे .
यावेळी सरपंच प्रणाली खानोलकर यांच्या हस्ते पथदिप सुरू करण्यात आले . यावेळी सरपंचांनी केंद्रीय मंत्री नारायणराव राणे साहेबांचे आभार मानले.तसेच भाजपा च्या माध्यमातून दुर्गम भागात निधी देऊन ग्रामीण भागातील जनतेची सोय केल्याबद्दल समाधान व्यक्त केले . यावेळी शुभारंभ प्रसंगी लाडु वाटुन सर्वांचे तोंड गोड करण्यात आले .
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , जि.का.का.सदस्य मनवेल फर्नांडीस , ता.सरचिटनिस बाबली वायंगणकर , जेष्ठ नेते बाळा सावंत , शक्ती केंद्र प्रमुख सुधीर गावडे , उपसरपंच सुभाष खानोलकर , बुथ प्रमुख बाळु खानोलकर , दिंव्यांग आघाडीचे सुनील घाग , मनोहर खानोलकर , सुनील सावंत , सचिन नार्वेकर , बाबा मोर्ये इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते .