प्रजापीता ब्रम्हकुमारीच्या संचालिकेने तळेरेतील प्रतिष्टिताना राख्या बांधून केला उत्सव साजरा

प्रजापीता ब्रम्हकुमारीच्या संचालिकेने तळेरेतील प्रतिष्टिताना राख्या बांधून केला उत्सव साजरा

*कोकण Express*

*प्रजापीता ब्रम्हकुमारीच्या संचालिकेने तळेरेतील प्रतिष्टिताना राख्या बांधून केला उत्सव साजरा*

*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*

प्रजापीता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय जानवली यांच्या मार्फत तळेरे ग्रामपंचायत मध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी तळेरे येथील विविध पदाधिकारी यांच्यासह प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या प्रमुख संचालिका संध्या दिदी उपस्थित होते.

रक्षाबंधन कार्यक्रम ग्रामपंचायत तळेरे सरपंच हनुमंत तळेकर यांच्या सहकार्याने तळेरे ग्रामपंचायतीच्या सभागृहामध्ये आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमाला तळेरे सरपंच हनूमंत तळेकर, उपसरपंच शैलेश सुर्वे, ग्रामपंचायत सदस्य, माजी सभापती दिलिप तळेकर, माजी सरपंच चंद्रकांत तळेकर, प्रवीण वरूणकर, तळेरे आरोग्य केंद्रच्या आरोग्य अधिकारी डाॅ. धनश्री जाधव आणि ग्रामस्थामधून मोहन भोगले, मनाली भोगले, शरद वायगंणकर, निलेश सोरप व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

या पविञ रक्षाबंधनाबाबत प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या प्रमुख संचालिका संध्या दिदी यांनी अत्यंत उपयुक्त माहिती देत मार्गदर्शन केले. तर माजी सरपंच चंद्रकांत तळेकर यांनी आभार मानताना आज रक्षाबंधनाच्या माध्यमातून प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाकडून मिळालेली माहीती महत्त्वाची आणि अनमोल अशी मिळाल्याने समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!