कणकवली फोंडाघाट रोड वर गॅस सिलेंडर गाडीच्या चालकाला समोहन करून लुटले

कणकवली फोंडाघाट रोड वर गॅस सिलेंडर गाडीच्या चालकाला समोहन करून लुटले

*कोकण Express*

*कणकवली फोंडाघाट रोड वर गॅस सिलेंडर गाडीच्या चालकाला समोहन करून लुटले*

*फोंडाघाट, ः प्रतिनिधी*

कणकवली हून फोंडाघाट च्या दिशेने येणाऱ्या भारत गॅस सिलेंडर गाडीच्या चालक व क्लिनर वर कार मधून आलेल्या अज्ञाताने समोहन करून त्यांच्याकडील रोख रक्कम काढून घेत कणकवली च्या दिशेने पोबारा केला. दरम्यान सदरची घटना आज सायंकाळी 4.30 ते 5 वा च्या दरम्याने कणकवली फोंडाघाट रोडवरील करुळ काचकारखाना स्टॉप समोर घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, दर शनिवार प्रमाणे आज पिकअप गाड़ी नं. एम एच 07-ए जे 1680 ही गाडी घेऊन गाडी चालक संतोष कदम व सोबत क्लिनर रुपेश खरात हे दोघे पावनादेवी हरकुळ कनेडी व कणकवली रोड वरील भारत गॅस च्या ग्राहकांना गॅस टाकी ची डिलेव्हरी करत फोंडाघाट च्या दिशेने येत असताना वाटेत करुळ काच कारखाना स्टॉप जवळील भारत गॅस चे ग्राहक जांभेकर यांना गॅस टाकी ची डिलेव्हरी करण्यासाठी गाडी चालक संतोष कदम याने रस्ता सोडून त्याच्या घराजवळील मैदानात आपली पिकअप गाडी उभी करून सिलेंडर टाकी देत असताना अचानक फोंडाघाट च्या बाजूने आलेली निळ्या आकाशी कलर ची टोयाटो कंपनी ची कोरोलो अल्टीस कार समोर रस्त्यावर येऊन थांबली व त्यातून उत्तरलेल्या अज्ञात व्यक्तीने या दोघांकडे आधी सिलेंडर ची चौकशी करत एक काच सदृश्य वस्तू दोघांसमोर करून समोहन सारखा प्रकार करत त्याच्याकडून त्यांच्या जवळ असलेली आणी दिवसभरात सिलेंडर डिलेव्हरी करून जमा केलेली साधारण अंदाजे 40 ते 50 हजाराची रोख रक्कम काढून घेत आपल्या कार मधून कणकवली च्या दिशेने पलायन केले. दरम्यान काही वेळाने भानावर आलेल्या ड्रायवर व क्लिनर यांना आपल्याकडून रोख रक्कम लुटली असल्याचे लक्षात येताच ताबडतोब पोलिसांच्या 100 नंबर ला या लुटीची खबर दिली. दरम्यान याबाबत कणकवली पोलीस स्थानकामध्ये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु असून फरारी कार बाबत अद्यापही कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!