*कोकण Express*
*कणकवली जाणवली येथील दुचाकी अपघात..*
*वागदे येथील युवकाचा जागीच मृत्यू !*
*कणकवली ः प्रतिनिधी*
तालुक्यातील जाणवली ओव्हरब्रिज दरम्यान रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलस्वाराचा अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की मोटारसायकल स्वार जागीच ठार झाला. कणकवली तालुक्यातील वागदे येथील गणेश उदय काणेकर ( वय – १७ रा. वागदे सावरवाडी, गोपुरी ) असे त्याचे नाव आहे.
अपघाताची घटना घडल्यावर माहिती मिळताच कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र अपघातात त्याला गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच गतप्राण झाल्याचे उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी सांगितले. गणेश याच्या डोकीला पाठीमागे जखमा होऊन रक्तस्राव होऊन त्याचे कानातून तसेच हातापायाला किरकोळ जखमा झाल्या होत्या, अशा अवस्थेत असताना त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान अपघाताची माहिती मिळताच कणकवली तालुक्यासह आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालयाकडे धाव घेतली. गणेश हा जाणवलीहुन वागदे च्या दिशेने जात असताना त्याचा अपघात झाल्याची चर्चा उपजिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या नागरिकांकडून सांगण्यात आले.
गणेश यांच्या पाश्चात आई, वडील व दोन बहिणी असा परिवार आहे.
अपघाताची माहिती मिळताच कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विनायक चव्हाण, श्री, देसाई यांनी घटनास्थळासह उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. यावेळी मिलिंद मेस्त्री, आण्णा कोदे, ऍड. सुहास साटम, बबली राणे यांच्यासह अनेकांनी धाव घेतली होती.

