*कोकण Express*
*कलमठ ग्रामपंचायतच्या ध्वजारोहण करण्याचा शिपाई रमेश चव्हाण बहुमान..*
*सरपंच संदीप मेस्त्री यांनी शिपाई रमेश चव्हाण यांच्या ३५ वर्षे सेवेबद्दल केला सन्मान*
*कणकवली ः प्रतिनिधी*
स्वातंत्र अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रत्येक शासकीय कार्यालयात ३ दिवस ध्वजारोहन होणार आहे. त्यानिमित्ताने पहिल्या दिवशी कलमठ ग्रामपंचायत मध्ये ३५ वर्षे शिपाई म्हणून उत्कृष्ठ सेवा बजावल्याबद्दल रमेश विष्णु चव्हाण यांना ध्वजारोहनाचा बहुमान सरपंच संदीप मेस्त्री यांनी दिला.
यावेळी ग्रामविकास अधिकारी प्रवीण कुडतरकर, सदस्य रविंद्र यादव, अनूप वारंग, दिनेश गोठनकर, प्रीति मेस्त्री, हेलन कांबळे, सचिन खोचरे, धीरज मेस्त्री, सुप्रिया मेस्त्री, स्वाति नारकर, नजराना शेख, प्रियाली आचरेकर, योगिता चव्हाण मुख्याध्यापक सावंत मॅडम, शिक्षक, कर्मचारी, आशा व अंगणवाड़ी सेविका उपस्थित होते.

