*कोकण Express*
*कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांचा सिंधुदुर्ग दौरा संपन्न*
*सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख (अध्यक्ष मुख्याध्यापक संघ) वामन तर्फे सर*
दिनांक 11.08.2023 रोजी शिक्षक आमदार श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांचे शिक्षकांच्या व शिक्षकेतर बांधवांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उपस्थीत होते, सर्वप्रथम त्यांनी I.T.I ओरोस या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तेथील शिक्षकांच्या समस्या जाणून घेतल्या, त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हयातील शिक्षकांचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडवण्यासाठी शिक्षणाधिकारी माध्यमिक व शिक्षणाधिकारी प्राथमीक यांच्यासोबत मिटिंग घेऊन आढावा घेतला यामध्ये सर्वप्रथम मागील महिन्यामध्ये दिलेल्या कामांचा आढावा घेत त्यातील 95% कामे पूर्ण झालेली आहेत, त्यातील 5% कामे काही त्रांत्रिक अडचण आणि त्रुटी मध्ये असल्यामुळे ती कामे देखील पुढील काही दिवसात पूर्ण करणार असल्याचे शिक्षणाधिकारी यांनी आश्वासीत केले. यावेळेस शिक्षणाधिकारी माध्यमिक श्री. चौगुले साहेब , शिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री.वामन तर्फे सर, सचिव श्री.कुसगावकर सर, घावरे सर , वाळके सर, चोडणकर सर, चौकेकर सर , कमलेश गोसावी, ठाकूर सर, आळवे सर, घाडी सर, साटळकर मॅडम, खरात सर, विविध शिक्षक संघटनेचे विविध पदाधिकारी , शिक्षण विभागातील सर्व कर्मचारी, व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुख्याध्यापक,शिक्षक,व शिक्षकेतर कर्मचारी, संस्थाचालक संस्था पदाधिकारी उपस्थित उपस्थित होते*.
*सर्व शिक्षक बांधव आप आपल्या समस्या आमदार श्री. म्हात्रे सरांजवळ मांडत होते. यामध्ये वरिष्ठश्रेणी, निवडश्रेणी प्रस्ताव , शालार्थ आय.डी. , शिक्षकांच्या रखडलेल्या मान्यता, थकीत बिले, अनुकंपा नोकरी,असे अनेक प्रश्न मांडले*.
*शिक्षकांचे प्रश्न तात्काळ सुटले पाहिजेत कामात दिरंगाई केल्यास अधिकारी, कर्मचारी यांची गय केली जाणार नाही. येत्या १५ दिवसात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकांच्या समस्या सुटल्या पाहिजेत, २ महिन्यांनी शिक्षकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी मी पुन्हा येणार असल्याचे आमदार श्री.ज्ञानेश्वर म्हात्रे सरांनी संगितले.*
*त्यानंतर आमदार श्री.ज्ञानेश्वर म्हात्रे सरांनी शिरगाव हायस्कूल, शिरगाव तळेबाजार हायस्कूल याशाळेना भेट दिली. त्यानंतर त्यांनी देवगड तालुक्यातील मुख्याध्यापक, शिक्षक यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जामसंडे हायस्कूल, देवगड या ठिकाणी भेट देऊन त्यांचा समस्या जाणून घेतल्या*.

