सावंतवाडी उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीमती संध्या गावडे यांचे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे करण्यात आले स्वागत.

सावंतवाडी उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीमती संध्या गावडे यांचे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे करण्यात आले स्वागत.

*कोकण Express*

*सावंतवाडी उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीमती संध्या गावडे यांचे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे करण्यात आले स्वागत..*

*सिंधुदुर्ग :-*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी उपविभागीय पोलिस अधिकारी पदाचा पदभार श्रीमती संध्या गावडे यांनी नुकताच स्विकारला असून आज महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,सिंधुदुर्ग यांच्यावतीने पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार श्री आबा खवणेकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करुन त्यांच्या पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

श्रीम संध्या गावडे यांनी यापूर्वी जिल्हा मुख्यालयात जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात उपअधिक्षक म्हणून अतिशय उल्लेखनीय कार्य केले आहे.आता त्यांची नियुक्ती सावंतवाडी उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून झाली आहे.त्यांच्या आता पर्यंतच्या सेवा कार्यकालात एक शिस्तप्रिय,प्रमाणिक,कार्यक्षम,कर्तव्यदक्ष महिला अधिकारी म्हणून त्यांनी आपल्या पोलिस विभागासह जनतेच्या मनात स्थान निर्माण केले आहे.

यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सहसचिव कृष्णा सावंत,सदस्य प्रसन्न गोंधावळे,मिलिंद धुरी,आनंद कांडरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!