आम आदमी पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदी विवेक ताम्हणकर यांची नियुक्ती

आम आदमी पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदी विवेक ताम्हणकर यांची नियुक्ती

*कोकण Express*

*आम आदमी पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदी विवेक ताम्हणकर यांची नियुक्ती*

*महाराष्ट्र प्रदेश सहप्रभारी गोपाल इटालिया, प्रदेश संघटन मंत्री रियाज पठाण यांनी केली नियुक्ती*

आम आदमी (आप) पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी विवेक ताम्हणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सहप्रभारी तथा गुजरातचे प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया व प्रदेश संघटन मंत्री रियाज पठाण यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. आम आदमी पार्टीचे संस्थापक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विचारधारेला साजेशे आणि भ्रष्टाचार निर्मुलनासाठी काम करणार असल्याचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यावेळी म्हणाले.लवकरच दिल्ली येथे अरविंद केजरीवाल यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
विवेक ताम्हणकर हे विद्यार्थी दशेपासून परिवर्तनाच्या चळवळीत काम करतात. गेली 22 वर्ष ते विविध माध्यमातून जिल्ह्यात पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. विद्यार्थी चळवळीच्या काळात ग्रामीण विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
अलीकडेच त्यांनी मुंबईत आपल्या काही समविचारी सहकाऱ्यांसोबत आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सहप्रभारी तथा गुजरातचे प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया यांची भेट घेतली होती. यानंतर त्यांची आज पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडी बद्दल त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!