छत्रपतींचा द्वेष करणाऱ्या नेमाडेंसारख्यांचे पुरस्कार परत घ्या ; आमदार नितेश राणे

छत्रपतींचा द्वेष करणाऱ्या नेमाडेंसारख्यांचे पुरस्कार परत घ्या ; आमदार नितेश राणे

*कोकण Express*

*छत्रपतींचा द्वेष करणाऱ्या नेमाडेंसारख्यांचे पुरस्कार परत घ्या ; आमदार नितेश राणे*

*छत्रपती शिवराय,छत्रपती संभाजी महाराज यांच्या पेक्षा औरंग्या मोठा होता हे दाखवण्याचे सुरू आहे षडयंत्र*

*लेखक भालचंद्र नेमाडे या षड्यंत्राला घालत आहेत खत पाणी,आमदार राणे यांचा आरोप*

*कणकवली ः प्रतिनिधी*

औरंगजेब हा हिंदुद्वेषी होता. त्याने हिंदूंची मंदिरे तोडली. हिंदू महिलांवर आणि समाजावर अतोनात अन्याय केले. अशा अन्यायाविरोधात लढा देत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.औरंग्याच्या विरोधात संघर्ष केला. छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदू धर्म सोडून धर्मांतर करण्यास औरंगजेबास स्पष्ट नकार दिला. धर्मांतराला विरोध केला. छत्रपती संभाजी महाराज औरंग्या समोर झुकले नाहीत. अशा औरंगजेबाला मोठे करण्याचे षडयंत्र महाराष्ट्र राज्यात चालू आहे आणि त्याला खत पाणी घालण्याचे काम लेखक भालचंद्र नेमाडे यांच्यासारखे लोक करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज हे आमचे दैवत आणि आदर्श आहेत.यांना औरंग्या पेक्षा लहान दाखवण्याचा प्रयत्न कोण करत असेल तर आम्ही खपवून घेणार नाही. अशा लोकांना देशात पुरस्कार देऊ नयेतच आणि दिलेले पुरस्कार परत घ्यावेत अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी सरकारकडे केली आहे.
आमदार नितेश राणे कणकवली ओम गणेश नमस्ते पत्रकारांशी बोलताना ज्ञानपीठ विजेते भालचंद्र नेमाडे यांच्या औरंगजेबावरील वक्तव्याचा चांगला समाचार घेतला. ते म्हणाले औरंगजेबाने जुलूम केले, अत्याचार केले, अशा औरंग्याला छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे समजायचे आणि छत्रपतींना इतिहासात लहान करायचे असे जे षडयंत्र चालू आहे. त्याला भालचंद्र नेमाडे हे खतपाणी घालतात औरंग्या हिंदू द्वेषी नहोता असे सांगून नेमाडे यांना औरंगजेबाची महती वाढवायची आहे. असेल प्रकार आम्ही खपवून घेणार नाही.असा इशाराच यावेळी आमदार नितेश राणे यांनी दिला.
ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत ने अकलेचे तारे चमकवले आहेत त्यांना पुढील मुक्काम आर्थर रोड जेलमध्ये असेल. जशी ईस्ट इंडिया कंपनी होती तशी ठाकरेंची हायवे कन्ट्रक्शन कम्पनी आहे का? असा सवाल करत महानगरपालिकेचे सर्व ठेके याच कंपनीला कसे गेले. कोरोना काळातील याच कंपनीत काम कसे केले असा सवाल उपस्थित केला. काल पासून पेंग्विन तडफडतोय कारण तू आता अडचणीत आणलेला आहे.
मातोश्रीचा टोल बंद झाल्याने ह्यांना आता मुंबईचे टोल आठवले आहेत. मात्र हेच मातोश्री २ कोणाच्या पैशातून बांधली, गुजराती आणि मारवाडी समाजाचे पैसे किती लागले याचा हिशोब द्यावा असे आव्हान नितेश राणे यांनी दिले.
अमित शहा 2024 मध्ये पण एकनाथ शिंदे अजित दादा पवार यांच्या बद्दल गौरव उद्गार काढणार कारण महाविकास आघाडीची पुन्हा सत्ता येणार आणि तो शपथविधी संजय राऊत अर्थ रोड जेलमध्ये बसून पाहणार. असा टोला यावेळी आणला.
राज उद्धव यांच्या फोन करणाऱ्या मुद्द्यावर आमदार नितेश राणे म्हणाले, राज साहेबांचा उद्धव ठाकरे किती वेळा अपमान करणार हे सांगावं.उद्धव ठाकरेंच्या वृत्ती मुळेच साप मातोश्रीत आला. त्या सापाला ही बघायचं होतं
आपल्या पेक्षा ही कोण तरी जास्त विषारी आहे. आणि म्हणून तो मातोश्रीत गेला.राऊत हे सकाळी उठून नाईंटी चा पॅक मारतात. तशी त्यांना सवय आहे.काल संसदेत भाषण करताना मारली होती का ? याची माहिती घ्यावी लागेल.असा टोला आणला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!