चिपळूण वैश्य समाजाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व कोरोना योद्ध्यांचा  गुणगौरव

*कोकण Express*

*चिपळूण वैश्य समाजाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व कोरोना योद्ध्यांचा  गुणगौरव…*

*चिपळूण ः प्रतिनिधी* 

वैश्य समाज चिपळूण या संस्थेच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे सामाजिक उपक्रम राबवले जातात यालाच अनुसरून इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी मधील ३५ गुणवंत विद्यार्थ्यांचा धनादेश आणि भेटवस्तू देऊन गुणगौरव  तसेच कोरोना सारख्या महाभयंकर परिस्थितीत आपल्या जीवाची पर्वा न करता सुरुवातीपासून आजतागायत कार्यरत असणाऱ्या विशेषतः आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर्स तसेच शासकीय व निमशासकीय, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, नर्सेस, वॉर्डबॉय, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी व आशा सेविका, तसेच मेडिकल स्टोअर्स, पॅथॉलॉजी लॅब, ऍम्बुलन्स सेवा, पोलीस अधिकारी व कर्मचारी,प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडिया, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह,  आदि क्षेत्राशी निगडित ५७ वैश्य समाजातील कोरोना योद्ध्यांचा सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र वैश्य समाज बांधवांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी चिपळूण वैश्य समाजाचे आधारस्तंभ श्री. सुचयअण्णा रेडीज, समाजाचे विश्वस्त श्री. उदयशेठ गांधी आणि श्रीमती कुंदाताई खेडेकर समाजाचे आधारस्तंभ ॲडव्होकेट श्री. दिलीप उर्फ भाऊ दळी , चिपळूण अर्बन बँकेच्या चेअरमन सौ. राधिका पाथरे, समाजाचे अध्यक्ष श्री. पंकज कोळवणकर, सल्लागार श्री अनिल उर्फ बाबुराव खातू , उपाध्यक्ष श्री. प्रमोद गांगण, सचिव श्री. अमोल टाकळे. समाजाचे आधारस्तंभ , श्री. अमरीश उर्फ दादा खातू, श्री. अनिल खेडेकर, श्री. सतीश अप्पा खेडेकर ,श्री. श्रीकृष्ण खेडेकर, नगरसेवक श्री. आशिष खातू नगरसेविका सौ. रसिका देवळेकर ,समाजाचे संचालक व लायन्स क्लबचे रिजनल चेअरमन श्री. नितीन उर्फ बापू गांधी ,वैश्य महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. गौतमी गांधी व महिला पदाधिकारी  तसेच युवक संघटनेचे अध्यक्ष श्री. रोहन चौधरी आणि पदाधिकारी, वैश्य वधू वर सूचक मंडळाचे उपाध्यक्ष श्री. नरेंद्र बेलवलकर, श्री. जगदीश साडविलकर, माजी नगरसेवक श्री. संजय वसंत रेडीज, सौ. प्रीतम देवळेकर ,श्री. विजय गांधी आणि पदाधिकारी सौ.छाया खातू , सौ.गीता चिंगळे, सौ. विभावरी गांधी,  श्री. मल्लेश लकेश्री, सौ. स्वाती देवळेकर ,श्री.अरविंद रेडीज, श्री.प्रकाश गांधी, श्री.शीतल देवळेकर श्री. सचिन साडविलकर  श्री. शिरीष दळी ,श्री. संजय शेरे, श्री रविंद्र कोकाटे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत विशेष गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाचे औचित्य साधून समाजाच्या विविध उपक्रमांसाठी सहकार्य करणारे अपूर्व केटरर्सचे संचालक श्री. केतन रेडीज आणि कोकाटे मंडप डेकोरेटर्सचे संचालक श्री. राजन कोकाटे यांचा आणि नुकत्याच संपन्न झालेल्या श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या नूतन संचालक मंडळावर अध्यक्षपदी नियुक्त झालेले श्री. उदय गांधी,उपाध्यक्षपदी श्रीमती कुंदाताई खेडेकर तसेच संचालक पदी श्री. सुरेश पाथरे, श्री.राजन खेडेकर, श्री. प्रशांत देवळेकर,  सौ.सई वरवाटकर,श्री. सिद्धेश लाड, श्री.कुंदन खातू आदि संचालकांचाही समाजाच्या वतीने विशेष गौरव करण्यात आला. तसेच समाजाच्या अंगीकृत वैश्य वधू- वर सूचक मंडळ, वैश्य महिला मंडळ आणि वैश्य युवक संघटना यांच्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना गौरवण्यात आले वैश्य समाजाच्या स्तुत्य उपक्रमासाठी अध्यक्ष श्री.पंकज कोळवणकर , सचिव श्री. अमोल टाकळे ,प्रोजेक्ट चेअरमन श्री. नयन साडविलकर, उपाध्यक्ष श्री प्रमोद गांगण, खजिनदार, श्री. प्रतीक रेडीज, श्री.संतोष टाकळे श्री प्रणय वाडकर, सौ. स्मिता गांधी , श्रीमती अश्विनी महाकाळ  यांनी विशेष मेहनत घेतली. अतिशय सुंदर आणि नियोजनबद्ध कार्यक्रम संपन्न झाल्याबद्दल सर्व समाज बांधवांनी संपूर्ण संचालक मंडळा चे अभिनंदन केले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चिपळूण वैश्य समाजाचे सचिव श्री. अमोल टाकळे यांनी केले.
या कार्यक्रमांमध्ये अनुपस्थित असणाऱ्या सत्कारमूर्तीनी संस्थेच्या राधाताई लाड सभागृह येथील कार्यालयात संपर्क साधून विद्यार्थी गुणगौरवाचे धनादेश व कोरोना योद्धा सन्मान घेऊन जावेत असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!