*”सुनिल तळेकर ट्रस्टचा रक्तदान शिबीर आयोजित केल्या बद्दल प्रमाणपत्र देऊन गौरव.”*

*”सुनिल तळेकर ट्रस्टचा रक्तदान शिबीर आयोजित केल्या बद्दल प्रमाणपत्र देऊन गौरव.”*

*कोकण Express*

*”सुनिल तळेकर ट्रस्टचा रक्तदान शिबीर आयोजित केल्या बद्दल प्रमाणपत्र देऊन गौरव.”*

*कासार्डे प्रतिनिधी: संजय भोसले*

तळेरे येथील सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट आणि विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 54 जणांनी रक्तदान केले .हे शिबिर जिल्हा रक्तपेढी यांच्या सहकार्याने झाले होते. शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तळेरे सरपंच हनुमंत तळेकर, जिल्हा परिषद सदस्य रवींद्र जठार, माजी सभापती दिलीप तळेकर ,डॉक्टर अभिजीत कणसे, ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश तळेकर, उपाध्यक्ष चंद्रकांत तळेकर ,वाचनालयाचे अध्यक्ष विनय पावसकर ,उपाध्यक्ष राजू वळंजू ,दळवी महाविद्यालयाचे प्राध्यापक हेमंत महाडिक, तंटामुक्ती अध्यक्ष मनोज तळेकर, शशांक तळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
तळेकर ट्रस्टच्या वतीने दरवर्षी दोन वेळा रक्तदान शिबिर आयोजित केले जाते. याशिवाय अनेक सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा ,शेती आणि सांस्कृतिक उपक्रम घेतले जातात. विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयाचेही अशा सामाजिक उपक्रमांना नेहमीच सहकार्य असते .एक सामाजिक उपक्रम म्हणून या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी या रक्तदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद मिळतो. याही वेळी 54 रक्तदात्यांनी उत्स्फूर्त रक्तदान केले .
हे शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जिल्हा रक्तपेढीचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दुर्गेश गुंगेवाड, परिचारिका प्रांजली परब, रक्तपेढी तंत्रज्ञ रुबीना मसलत ,मयुरी शिंदे ,कर्मचारी भाऊ कोकरे, सुरेश डोंगरे ,नितीन गावकर यांचे विशेष सहाय्य मिळाले .यावेळी रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल तळेकर ट्रस्टला मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!