लोकप्रिय आमदार नितेशजी राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी भाजपा बुथ अध्यक्ष व शक्ति केंद्रप्रमुख यांना छत्र्यांचे वाटप

लोकप्रिय आमदार नितेशजी राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी भाजपा बुथ अध्यक्ष व शक्ति केंद्रप्रमुख यांना छत्र्यांचे वाटप

*कोकण Express*

*लोकप्रिय आमदार नितेशजी राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी भाजपा बुथ अध्यक्ष व शक्ति केंद्रप्रमुख यांना छत्र्यांचे वाटप*

*जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे यांच्या उपक्रमातून वितरण.*

*वैभववाडी  : प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग भाजपा सरचिटणीस मनोज रावराणे यांच्यावतीने वैभववाडी तालुक्यातील भाजपा बुथ अध्यक्ष व शक्ति केंद्रप्रमुख यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. बुथ अध्यक्ष व शक्ति केंद्रप्रमुख यांची बैठक येथील भाजपा कार्यालयात माजी आमदार प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत पार पडली.
यावेळी जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे, वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी, जिल्हा चिटणीस भालचंद्र साठे, अरविंद रावराणे, नगराध्यक्षा नेहा माईणकर व भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रमोद जठार म्हणाले, यापुढे देखील तालुका, जिल्हा स्तरावर भाजपा अशीच शत प्रतिशत राहुदेत. मागील नऊ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले काम घराघरात पोहचले पाहिजे. केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकल्प जिल्ह्यात सुरू आहेत. गावागावात विकासाची गंगाा येत आहे. मोठ्या प्रमाणात रस्त्यांचं जाळ निर्माण होत आहे. रोजगार, शिक्षण व आरोग्य सुविधा चांगल्या प्रमाणे उपलब्ध होत आहेत. मोदीजींचे कार्य घराघरात पोहोचवा असे जठार यांनी सांगितले.
मनोज रावराणे म्हणाले, आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात पक्षाचे काम चांगले व शिस्तबद्ध चालू आहे. मतदार संघातील कामाची दखल राज्य तसेच देश पातळीवर घेतली जात आहे. यापुढे देखील काम करत राहूया असे सांगितले. नासीर काझी, भालचंद्र साठे यांनी मनोगत व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!