*कोकण Express*
*कौशल विकास योजनांचा फायदा घेऊन आत्मनिर्भर बना*…
*प्रसंन्ना ऊर्फ बाळु देसाई , जिल्हा सरचिटणीस ,भाजपा यांचं निवेदन…*
*वेंगुर्ले ः प्रतिनिधी*
केंद्रसरकारच्या स्कील डेव्हलमेंट आॅफ इंडिया या उपक्रमा अंतर्गत युवा परिवर्तन संस्थेमार्फत वेंगुर्ले तालुक्यामध्ये लाॅकडाऊनच्या काळात कोवीड च्या सर्व नियमांचे पालन करत मेणबत्ती , बेसीक केक , अॅडव्हान्स केक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते._ _या शिबिरात १०८ महीलांनी सहभाग घेतला होता . या शिबिरार्थींना प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम प्रसंन्ना देसाई यांचे हस्ते करण्यात आले . यावेळी व्यासपीठावर युवा परिवर्तन संस्था – सिंधुदुर्ग चे डेव्हलमेंट मॅनेजर दत्तात्रेय_ _परूळेकर , कार्यक्रम अधिकारी विवेक नाईक , जगदीश उगवेकर , सतीश गवस , सहदेव खोत , शिवानंद प्रभु , किशोर खानोलकर , प्रकाश पालयेकर इत्यादी उपस्थित होते._
_यावेळी मार्गदर्शन करताना प्रसंन्ना देसाई म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवक व युवतींना रोजगाराची संधी मिळावी म्हणून केंद्र सरकारच्या माध्यमातून पंडित दिनदयाळ उपाध्याय कौशल विकास योजनेतून रोजगाराभिमुख प्रशिक्षण वेगवेगळ्या क्षेत्रात सुरु केले आहे . त्याचा फायदा जास्तीत जास्त तरुण – तरुणींनी घेऊन *आत्मनिर्भर* बनावे असे आवाहन केले . तसेच युवा परिवर्तन ही संस्था एक रोजगाराभिमुख व्यवसाय प्रशिक्षण सिंधुदुर्ग जिल्हामध्ये आयोजित करत आहे ही एक समाधानाची बाब आहे . तसेच या संस्थेच्या माध्यमातून वेंगुर्ले तालुक्यातील ग्रामपंचायत निहाय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करावे व त्यासाठी लागणारे सहकार्य करु असे अभिवचन प्रसंन्ना देसाई यांनी दिले. यावेळी युवा परिवर्तन संस्थेमार्फत प्रशिक्षण घेतलेल्या तरुणी व महिलांनी आपली मनोगते व्यक्त करुन रोजगाराचे दालन खुले करुन दिल्याबद्दल संस्थेचे आभार मानले._

