अन्यथा गटशिक्षणाधिकारी कार्यालयात वर्ग भरवू

अन्यथा गटशिक्षणाधिकारी कार्यालयात वर्ग भरवू

*कोकण Express*

*अन्यथा गटशिक्षणाधिकारी कार्यालयात वर्ग भरवू*

*शिक्षणमंत्र्यांचा निषेध करत ठाकरे शिवसेनेचा कुडाळ पंचायत समितीत हल्लाबोल*

*१२१ शाळांमध्ये कायमस्वरूपी शिक्षकांसाठी छेडले आंदोलन*

*कुडाळ ः प्रतिनिधी*

सिधुदुर्ग जिल्ह्यातील १२१ शाळामध्ये कायमस्वरूपी शिक्षक नसल्याने विद्याथ्र्यांच्या शैक्षणिक जीवनावर परिणाम होणार आहे. त्यामुळे प्रत्येक शाळेत शिक्षक उपलब्ध होऊन विद्यार्थ्यांची शैक्षणिक समस्या दूर व्हावी, या मागणीसाठी ठाकरे शिवसेनेच्या वतीने आज कुडाळ पंचायत समिती शिक्षण विभाग कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येणार आहे. कुडाळ तालुक्यात जि. प. च्या १८ शाळा शून्य शिक्षकी आहेत. याठिकाणी त्वरीत शिक्षक उपलब्ध करण्यासाठी या अंतर्गत कुडाळ पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन छेडून शासनाचे लक्ष वेधण्यात आले. स्थानिक डी एड, बी. एड. बेरोजगाराना संधी देऊन तातडीने शिक्षक भरती न झाल्यास मुलांना गटशिक्षणाधिकारी कार्यालयात बसुवून येथे वर्ग भरवू असा ईशारा यावेळी आंदोलकांनी दिला. यावेळी शिंदे फडणवीस सरकार तसेच शिक्षणमंत्री केसरकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर गट शिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर यांना ठाकरे शिवसेनेकडून निवेदन देण्यात आले. खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाकरे शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख जमरसेन सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, संतोष शिरसाट, मिलिंद नाईक, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, स्नेहा दळवी, सई काळप, श्रेया गवडे, श्रुती वर्दम, सचिन काळ, बबन बोभाटे, अतुल बगे, बाबी गुरव, गोटया चव्हाण, मधुरा राऊळ, पूनम पवार, वैशाली पावसकर, मिलिद नाईक, बाळू पालव, जयभारत पालव यांच्यासहित ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!