*कोकण Express*
*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना युवा पत्रकार संघाच्या वतीने निवेदन*
*कोल्हापूर ः प्रतिनिधी*
गेल्या महिनाभर चर्चेत असलेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या अनुषंगाने तपोवण मैदानावर जय्यत तयारी व पोलिसांच्या कडक बंदोबस्तात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित पार पडला
मुख्यमंत्री कोल्हापुरात येत असल्याची बातमी युवा पत्रकार संघाला समजताच पत्रकार हिताच्या मागण्यांचे निवेदन देण्यासाठी युवा पत्रकार संघाचे पदाधिकारी गेले होते. आठ दिवस मुख्यमंत्री कक्ष, जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे रीतसर पत्राद्वारे भेटण्याची वेळ मागण्यात आले होती यांना पत्र पोचल्याची माहिती मिळाली पण पत्रकार संघाला भेटण्यासाठी कोणतीच कल्पना दिली नाही मुख्यमंत्री कोल्हापूरमध्ये सभेच्या ठिकाणी येण्या अगोदर काही तासाच्या अवधीत लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यातून कदम यांचा फोन आला व तुम्हाला मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी तुम्ही ठाण्यात या असे सांगण्यात आले. ठाण्यात युवा पत्रकार संघाचे पदाधिकारी गेल्यावर मात्र शाहूपुरी ठाण्याकडे आपली जबाबदारी असून तुम्ही शाहूपुरी पोलीस ठाणे गोपनीय अधिकारी पत्रकारांचे मित्र पीएसआय सुनील जवाहिरे यांच्याकडे पाठवले त्यांनी ताबडतोब पत्रकारांचे निवेदन असल्याने तात्काळ वरिष्ठांना फोन करून आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालय आरडीसी भगवान कांबळे यांच्याकडे आणून
मुख्यमंत्री यांना युवा पत्रकार संघाचे निवेदन देण्याचे सांगितले.
वेळ कमी असल्याने आरडीसी यांनी निवेदनावर रिमार्क करून मुख्यमंत्री सचिवांच्याकडे तपोवन मैदानावर पाठवले पीएसआय जवाहिरे यांनी पत्रकार संघाचे पदाधिकारी यांना सोबत घेऊन तपोवन मैदानाकडे येऊन जिल्हाधिकारी कार्यालयातील नेमणूक अधिकारी विजय कांबळे यांच्याकडे निवेदन देऊन पोहोच दिली.
एका निवेदनासाठी वेळेअभावी पोलीस प्रशासन युवा पत्रकार संघाच्या पत्रकार पदाधिकाऱ्यांना कसरत करावी लागली मात्र अखेर मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत निवेदन पोहोचले खर..
पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी युवा पत्रकार संघाच्या मागण्या,
केंद्र आणि राज्य पातळीवर माध्यम कर्मेयांना कोल्हापूर जिल्हयात पत्रकार भवन स्थापन
करण्यात यावे ते महाराष्ट्र सदन दर्जाचे असावे.
केंद्र व राज्य स्तरावर पत्रकार माध्यम कल्याण मंडळाची स्थापना करावी.
तहसील ते जिल्हास्तरापर्यंत मीडिया सेंटरची इमारत बांधण्यात यावी.
सर्व राज्यांमध्ये पत्रकार संरक्षण कायदयाच अंमलबजावणी करावी.
पत्रकार व पत्रकार कुटूंबियाना पत्रकार सुरक्षा भत्ता म्हणून दरमहा २५,०००/- रु. मानधन मिळावे.
समान संधी, समान हक्क, समान दंड संहिता, समान शिक्षण संहिता, एकसमान पोलीस संहिता, एकसमान आरोग्य संहिता, एकसमान न्यायिक संहिता, समान नागरी संहिता, एकसमान प्रशासन संहिता यावर ठोस कायदे केल पाहीजे,
पत्रकारांच्या छळाची व हल्ल्याची नोंद करण्यासाठी राज्य आणि जिल्हा स्तरावर पत्रकार श्रावण पोर्टल आणि हेल्पलाईन क्रमांक सेवा सुरु करावे.
प्रसार माध्यम संबंधित प्रकरणे निकाली काढण्यास साठी जिल्हा न स्तरावर स्वतंत्र जलदगती न्यायालय निर्माण करावीत.
पत्रकार आणि त्याच्या कुटुंबातील व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यास सरकारने किमान रूपये (२५ लाख ) मदत देण्याची तसेच एकाची सरकारी नोकरीची तरतुद लागू करावी.
१८ ते ६० वर्षे वया पर्यंतचे आणि प्रसारमाध्यम कर्मचारी यांना रोडवेज, बस, ट्रेन, विमान, या प्रवासादरम्यान तिकिटाच्या दरात 50%टक्के सवलत देण्यात यावी व टोल टॅक्स मोफत देऊन प्रवास पत्रकारांना जारी करण्यात यावी.
इतर राज्यात पत्रकार यांना इलेक्ट्रिक वाहने मोफत देण्यात आले आहे, त्याप्रमाणे महाराष्ट्रात श्रमिक पत्रकारांना देणेत यावी.
दिनांक 30/6/2023 रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेणेत आलेले शासन निर्णयाची तात्काळ आदेश द्यावे.
लोकशाहीचा चौथा स्तंभ बळकटकरणासाठी वरील मागण्यांचा विचार करून राज्यात प्रशासनाला अंमलबजावणी करण्याच्या सूचना द्यावेत यासाठी सांगण्यात आले. युवा पत्रकार संघ कोल्हापूर, पत्रकार व त्याच्या कुटुंबीय यांच्या न्याय हक्कासाठी कार्यरत असून संपुर्ण महाराष्ट्रात नाव लौकिक मिळविला आहे.
महाराष्ट्र राज्याचे जलदगतीने निर्णय घेणारे अल्पावधीतच नावलौकिक मिळवलेले लोकप्रिय
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे” यांनी
तरी युवा पत्रकार संघाच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करतील अशी आशा संस्थापक अध्यक्ष यांनी व्यक्त केली. या वेळी शिष्टमंडळ: संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे,
प्रदेश अध्यक्ष सुशांत पोवार,
राज्य उपाध्यक्ष जावेद देवडी,
प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव वळवडे,
राज्य सरचिटणीस अजय शिंगे,
कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष शरद माळी, करवीर अध्यक्ष अझरुद्दीन मुल्ला, दैनिक बंधुंताचे पत्रकार नियाज जमादार, रवि कांबळे उपस्थित होते.